वराडेतील दुहेरी खून प्रकरणातील आरोपीचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

उंब्रज (सातारा): वराडे (ता. कऱ्हाड) येथे कौटुंबिक वादातून चाकूने भोकसून पत्नीचा खून करून आई व स्वत:ला चाकूने भोकसल्याची घटना २९ जून रोजी रात्री घडली होती. यामधील गंभीर जखमी असलेल्या आईचा सात जुलैला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामधील संशयीत आरोपी पती सागर घोरपडे याचा आज (शुक्रवार) सकाळी उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सागर सदाशिव घोरपडे (वय.३६ रा. वराडे) असे मृत्यू झालेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. सागर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील तपास करत आहेत.

Web Title: warade double murder case death even