गावपुढारी लागले कामाला...

Ward structure program for gram panchayat elections
Ward structure program for gram panchayat elections

नगर ः चला गावकारभाऱ्यांनो, लागा कामाला. आपलं इलक्षण जवळ आलंय, असे म्हणत आता गावोगाव पुढारी मतदानाची आकडेमोड करू लागले आहेत. जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतींची प्रभागरचना जाहीर झाली असून, लगेच आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे तरुणांना गावपुढारपणाचे वेध लागले आहेत. 

765 ग्रामपंचायतींची मुदत संपणार 
डिसेंबर ते जुलै 2020 या कालावधीत जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींचाही यात समावेश आहे. ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेता प्रभागरचना, आरक्षण कालावधीसाठी विलंब लागणार आहे. त्यामुळे आज राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभागरचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

जनगणनेनुसार निश्‍चिती 
ग्रामपंचायतींच्या निवडणुका निर्भयपणे पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची आहे. आयोगाच्या आदेशाप्रमाणे लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणे त्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या 2011 मध्ये केलेल्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या निश्‍चित करण्यात येईल. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या दहा टक्के किंवा दहा टक्के जास्त मर्यादेत ठेवता येणार आहे. 

प्रभागरचना व आरक्षण कार्यक्रम 
प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे ः 20 डिसेंबर 2019 
अनुसूचित जाती, जमाती यांचे आरक्षण निश्‍चित करणे ः 30 डिसेंबर 2019 
प्रारूप प्रभागरचनेला मान्यता देणे ः 10 जानेवारी 2020 
प्रस्तावाची तपासणी, दुरुस्ती करणे ः 20 जानेवारी 2020 
प्रारूप प्रभागरचना आरक्षणाला समितीने मान्यता देणे ः 30 जानेवारी 2020 
हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करणे ः 7 फेब्रुवारी 2020 
हरकती सादर करण्याचा अंतिम तारीख ः 14 फेब्रुवारी 2020 
हरकती व सूचना सुनावणी घेणे ः 29 फेब्रुवारी 2020 
जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम प्रभागरचनेला मान्यता ः 21 मार्च 2020 

तालुकानिहाय ग्रामपंचायती 
अकोले-51 
संगमनेर-93 
कोपरगाव-29 
श्रीरामपूर-27 
राहाता-25 
राहुरी-45 
नेवासे-59 
नगर-57 
पारनेर-88 
पाथर्डी-78 
शेवगाव-48 
कर्जत-56 
जामखेड-50 
श्रीगोंदे-59 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com