चास कमान धरणातून रब्बी हंगामासाठी पाहिले आवर्तन सोडले

khed
khed

खेड - तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता शुक्रवारी सकाळी चास कमान धरणातून डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामातील पाहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली असून हे आवर्तन 95 दिवस चालणार असल्याची माहिती खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी दिली आहे धरणात सद्य स्तिथीत 84 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सदर रोटेशन हे पन्नास दिवसांचे पाहिले व दुसरे सलग पंचेचाळीस दिवसांचे दुसरे असे 95 दिवस सलग आवर्तन सुरू राहणार आहे

खेड तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकू लागली असून पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासू लागली आहे या बाबत शेतकऱ्यांनी आमदार गोरे तसेच या भागातील जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्याकडे चास कमान धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती त्या मागणीचा विचार करून आमदार गोरे यांनी योग्य ती कार्यवाही करून नियोजन ठरल्याप्रमाणे पंधरा दिवस आगोदर कालव्याला पाणी सोडले शुक्रवारी सकाळी आमदार सुरेश गोरे यांनी धारणस्थळी जाऊन बटन दाबून कालव्याला आवर्तन सोडले या वेळी त्यांच्या समवेत पंचायत समितीचें उपसभापती भगवान पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाडेकर, एल बी तनपुरे, मारुती सातकर, शशिकांत काळे, धरणाचे उप अभियंता उत्तम राऊत, शाखा अभियंता सचिन शिंदे, विलास सोनवणे, स्वरूप नाईकरे, वासुदेव घोलप यांसह धरण कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com