पाण्यासाठी उपळाईकरांचा भ्रमनिरास

अक्षय गुंड
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

उपळाई बुद्रूक (सोलापूर) - सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी माढा तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्यांनी आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून रस्ता रोको अंदोलने केल्यानंतर काही गावांना पाणी मिळाले. पाणी सोडण्याचे लेखी आश्वासने देऊनही टेलकडील शेवटच्या भागात पाणी पोहचु शकले नाही. पाण्याचे व्यवस्थितपणे नियोजन न केल्याने व प्रशासानाचा योजनेवर वचक नसल्याने अश्या भोंगळ कारभारमुळे आठवडाभर उपोषण करून देखील पाणी न मिळाल्याने उपळाईकरांचा भ्रमनिरास झाला आहे.

कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची गडद छाया दिसु लागली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चार्यांची व पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असताना. सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची एकच आशा असल्याने. पाणी सोडण्याची मागणी उपळाई बुद्रूक, उपळाई खुर्द, रोपळे खुर्द, विठ्ठलवाडी परिसरातुन वाढली. याबाबत तहसील प्रशासनास रस्ता रोको अंदोलनांचा इशार्यांचे निवदेन दिल्यानंतर सात दिवसात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. महिना उलटत आला तरीदेखील पाणी न आल्याने निवदेण देऊन जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भीमानगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास टाळे टोकण्यात आले. त्यावेळी दोन दिवसात पाणी सोडण्याचे लेखी दिले. तरीही पाणी न आल्याने शेतकर्यांनी आक्रमक होत माढा तहसिल कार्यालयसमोर बेमुदत उपोषण धरले. उपोषणांच्या चौथ्या दिवशीसुध्दा पाणी सोडण्याच्या हालचाली प्रशासनाकडुन दिसत नसल्याने आत्मदहनांचा इशारा दिल्यानंतर भुताष्टे मायनर मधुन उपळाईकडे पाणी सोडण्यात आले.

पाणी टेलकडील शेवटच्या भागात पोचविण्याची प्रशासनाची जबाबदारी असताना. पाणी घेण्यासाठी फोडाफोडाचे प्रकार होत असताना प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने उपळाई भागात पाणी पोहचु शकले नाही. प्रशासनाच्या बेभरवश्याच्या लेखी आश्वासनमुळेच आवर्ताची मुदत वाढुन देखील पाणी उपळाईला पोहचु शकले नाही. प्रशासन कुणाच्यातरी मर्जीनुसार काम करत आहे. त्यामुळे संबधित पाणी फोडण्यार्यावर कारवाई करू शकले नाही. एवढी अंदोलने करूनही कसे का व कुणामुळे उपळाई पाणी मिळाले नाही? अशी प्रतिक्रिया शेतकर्यांनी येत आहे. 

कुसाळात कशाला पाणी येतय..
- उपळाई परिसरातील शेतकर्यांनी एवढी अंदोलने करून देखील पाणी न आल्याने मिश्किलपणे सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी 'ऊसाच्या भागासाठी असुन आपल्याकडे कुसळात कशाला येतेय पाणी' अशी उपरोधक चर्चा नागरिकांतुन होत आहे.

Web Title: water crisis in solapur district