धरणातील पाणी ही राष्ट्राची नैसर्गिक संपत्ती - हरिभाऊ बागडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

'कुठल्याही धरणातील पाणी ही राष्ट्राची नैसर्गिक संपत्ती असून त्यावर सर्वांचा सामन्यांचा हक्क आहे. याच भूमिकेतून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी हे शासन देणार, तुम्ही काळजी करू नका.' अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज (गुरुवार) दिली.

कोपरगाव - 'कुठल्याही धरणातील पाणी ही राष्ट्राची नैसर्गिक संपत्ती असून त्यावर सर्वांचा सामन्यांचा हक्क आहे. याच भूमिकेतून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी हे शासन देणार, तुम्ही काळजी करू नका.' अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज (गुरुवार) दिली. संजीवनी उद्‌योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी आपत्ती पथक व्यवस्थापनाचे उद्‌घाटन बागडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री शंकरराव कोल्हे अध्यक्षस्थानी होते. आमदार स्नेहलता कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी फौंडेशनचे सुमीत कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डीच्या नगराध्यक्ष योगीता शेळके, अभय शेळके, रमेश गिरी महाराज आदी उपस्थित होते. 

यावेळी गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व रोपांचे वाटप करण्यात आले. बागडे म्हणाले, 'माजी मंत्री कोल्हे यांनी जलसंपदा व शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची दारे त्यांनी उघडी केली. आपत्ती पथक व्यवस्थापनातून नवीन पिढी उभी करण्याचे काम कोल्हे कुटुंबीय करत आहे. तसेच, यावेळी आमदार कोल्हे म्हणाल्या, 'निळवंडेप्रश्‍नी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यांच्या सिंचनाच्या पाण्याला धक्का न लावता पिण्याचे पाणी आणले आहे. तालुक्‍याच्या विविध समस्या सोडविण्यासाठी माझी धडपड सुरूच राहील.'  तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी यावेळी आभार मानले.

Web Title: The water in the dam is the natural property of the nation says haribhau bagde