अलमट्टीतून 2,58,710; कोयनेतून 50,218 तर राधानगरीतून 7112 क्‍युसेक विसर्ग 

अलमट्टीतून 2,58,710; कोयनेतून 50,218 तर राधानगरीतून 7112 क्‍युसेक विसर्ग 

कोल्हापूर - राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3, 4, 5 व 6 उघडले आहेत. यामधून 7112 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच अलमट्टी धरणामधून 2,58,710 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. कोयना धरणामधून आज दुपारी 1 वाजता 50,218 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. 

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 11 वाजता 45 फूट 1 इंच असून एकूण 86 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.30 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहेत. 

एकूण 86 बंधारे पाण्याखाली (नदी व त्यावरील पाण्याखाली गेलेल बंधारे)
पंचगंगा नदीवरील - राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. 
भोगावती नदीवरील - राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. 
कासारी नदीवरील - बाजारभोगाव, वालोली, ठाणे - आळवे, पुनाळ - तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. 
तुळशी नदीवरील - बीड, आरे व बाचणी. 
वारणा नदीवरील - चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. 
कडवी नदीवरील - सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. 
दुधगंगा नदीवरील - दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड व बाचणी व कसबा वाळवे. 
कुंभी नदीवरील - शेनवडे, कळे (खा), वेतवडे व मांडूकली. 
वेदगंगा नदीवरील - कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली व सुक्‍याचीवाडी. 
हिरण्यकेशी नदीवरील - साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे व गजरगाव. 
घटप्रभा नदीवरील - बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. 
ताम्रपणी नदीवरील - कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी. 
शाळी नदीवरील - येळावणे, कोळगाव व टेकोली. 
धामणी नदीवरील - सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी व म्हसूर्ली 
असे एकूण 86 बंधारे पाण्याखाली आहेत. 

नजिकच्या कोयना धरणात 94.19 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 99.905 इतका पाणीसाठा आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा
तुळशी 3.18 टीएमसी, वारणा 33.20 टीएमसी, दूधगंगा 19.78 टीएमसी, कासारी 2.47 टीएमसी, कडवी 2.51 टीएमसी, कुंभी 2.58 टीएमसी, पाटगाव 3.34 टीएमसी, 1.19 टीएमसी, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी 

बंधाऱ्यांची पाणी पातळी अशी - 
राजाराम 44.10 फूट, सुर्वे 42.3 फूट, रुई 72.3 फूट, इचलकरंजी 67.6 फूट, तेरवाड 64 फूट, शिरोळ 61.9 फूट, नृसिंहवाडी 61.3 फूट, राजापूर 49.6 फूट तर नजीकच्या सांगली 40.4 फूट आणि अंकली 44 फूट  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com