कोयना धरणातून 2100 क्‍यूसेकने विसर्ग; सांगलीत कृष्णेची पातळी 24 फुट 

Water has been released by 2100 cusecs from Koyna dam at Sangali
Water has been released by 2100 cusecs from Koyna dam at Sangali

सांगली - कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने दमदार पाऊस सुरु असल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आज सकाळपासून सुरु करण्यात आला. प्राथमिक टप्प्यात वीज निर्मितीसाठी 2100 क्‍यूसेकने पाणी सोडले जात असून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाणार आहे. त्याचा फुगवटा टाळण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनाशी सांगली पाटबंधारे विभाग सातत्याने संपर्क ठेवून आहे. तेथून तब्बल 70 हजार क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गेल्या आठवडाभरात हळूवार वाढ होती. गेल्या चोवीस तासांत मात्र तब्बल पाच फुटाने पाण्याची पातळी वाढली असून मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ती आयर्विन पुलाजवळ 24 फुटांच्या जवळपास होती. सांगली बांधारा पाण्याखाली गेला आहे. तिकडे चांदोली धरणातून आज 2000 क्‍यूसेकने पाणी विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 13 हजार 885 क्‍यूसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे हरिपुरात कृष्णा वारणा संगमावर विस्तीर्ण प्रवास दिसतोय. 

दरम्यान, सांगलीत पूरस्थिती निर्माण होण्यासाठी कृष्णेची पातळी 35 फुटांवर जावी लागते. कोयना धरणातून दहा हजार क्‍यूसेकहून अधिक विसर्ग सोडला तरी पूरस्थितीची लगेच भिती नाही. कारण, जिल्ह्यात कृष्णाकाठी अद्याप मध्यम स्वरुपाचाच पाऊस पडतोय. गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यातही पावसाने तळ ठोकला असून रिपरिप पाऊस सुरु आहे. 
शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागात समाधानकारक पाऊस पडत असल्याने सर्वजण सुखावले असले तरी चांदोली अभयारण्य, वारणा धरण परिसर आणि पश्‍चिम भागातील संततधार पावसाचा कहर आणि वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग या दोन्हीमुळे वारणा नदीने धारण केले आक्राळ-विक्राळ रूप. यामुळे नदी काठाची पीक, गुरांचा ओला चारा मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेला असल्याने जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com