उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग वाढला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

सोलापूर : उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्यामध्ये घट झाली होती. मात्र, आज दुपारी चार वाजता त्या पाण्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. दौंड येथून येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ झाल्याने साहजिकच उजनी धरणाच्या पाण्यामध्येही वाढ होणार आहे. 

दौंड येथून गुरुवारी (ता. 19) 24 हजार 996 क्‍युसेकने पाणी येत होते. शनिवारी (ता. 21) हा आकडा सहा हजार 288 वर गेला होता. मात्र, आज दुपारी चार वाजता त्यामध्ये पाच हजार 335 क्‍युसेकने वाढ होत तो 11 हजार 645 इतका झाला आहे. पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या थोड्याफार पावसाने पुन्हा दौंड येथून धरणात मिसळणाऱ्या पाण्याचा वेग वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आज दुपारी चार वाजता धरणात 20.35 टक्के इतका पाणीसाठा झाला होता. हीच स्थिती राहिली तर धरणातील पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

आज सकाळी सहा वाजता दौंड येथून धरणात सहा हजार 175 क्‍युसेकने पाणी येते होते. मात्र, दुपारी चार वाजता त्यात वाढ झाली. धरणातील एकूण पाणीसाठा 74.56 टीएमसी इतका आहे. तर उपयुक्त पाणीसाठा 10.90 टीएमसी इतका आहे. धरणाची पाणी पातळी दुपारी चार वाजता 492.490 मीटर इतकी झाली होती. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात 5.44 टक्के पाणीसाठा होता. 

Web Title: water increase in ujani dam