Vidhan Sabha 2019 सातारा जिल्ह्यातील मतदान केंद्रात घुसले पाणी

Polling Booth from karad taluka in flood
Polling Booth from karad taluka in flood

उंब्रज : सातारा जिल्ह्यात रविवार (ता. 20) दिवसभर मुसळधार पाऊस सुरु राहिल्याने बुहतांश पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी काही भागांत सायंकाळपर्यंत निवडणुकीसाठीचे साहित्य घेऊन गेलेले कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकले नाहीत. दरम्यान पाल (ता. कराड) येथील मतदान केंद्रांत पाणी घुसल्याने ते केंद्र पाल ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरित करावे लागले आहे.

पावसाच्या संततधारेमुळे कोयना, कृष्णा, उत्तरमांड, बाणगंगा आदी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. उरमोडी, धोम, कण्हेर, कोयना, तारळी आदी प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. पावसामुळे बहुतांश पूल पाण्याखाली आले. सातारा बस स्थानकातून दुपारनंतर वडूज, दहिवडी, म्हसवडकडे जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या होत्या.

पाल (ता. कराड) येथे पुरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. तारळी नदीपात्राच्या पाण्यात वाढ झाली आहे. तारळी नदीपात्रात पार्किंगसाठी बनविलेल्या पुलावरून रविवारी दुपारी पाणी वाहिले. पुलाच्या पश्‍चिम बाजूकडील पालमध्ये पाणी घुसले असून पाल - चोरे रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे परिसरातील अनेक दुकानांतही पाणी घुसले आहे.

पाल पेंबरमधील मतदान केंद्र क्रमांक 31 मध्ये अंगणवाडी शाळेत पावसाचे पाणी घुसले आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाला. मतदारांची अडचण होऊ नये यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकरी (तहसिलदार) अमरदीप वाकडे यांनी भारत निवडणूक आयोगास मतदान केंद्र स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानूसार निवडणूक आयोगाने मान्यता दिली.
 
त्यामुळे हे मतदान केंद्र पाल ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यानूसार पाल पेंबरमधील मतदान केंद्र क्रमांक 31 (अंगणवाडी शाळा) येथील मतदारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
 
मतदान केंद्र, मतदार यादीत नाव शोधण्यासाठी... 

मोबाईलच्या प्ले स्टोअर्समध्ये जाऊन व्होटर्स हेल्पलाइन हे ऍप डाउनलोड करा 
किंवा www.nvsp.in , www.ceomaharashtra.gov.in संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com