2019 ला मीच पुन्हा या खात्याचा मंत्री होणार : तानाजी सावंत

Tanaji Sawant
Tanaji Sawant

मंगळवेढा : मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन आमदार होण्याचे स्वप्न काहींनी बाळगले त्यांना जनता कदापी आमदार होऊ देणार नाही. आता आमचे ठरलंय 2019 ला मी पुन्हा याच खात्याचा मंत्री होणार असल्यामुळेच या भागात हरितक्रांती आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याची, ग्वाही जलसंपदामंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांनी मंगळवेढयात आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना दिली.

जलसंपदा मंत्री निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते यावेळी वेळी व्यासपीठावर खा. ओमराजे निंबाळकर, जिल्हा समन्वयक  प्रा शिवाजी सावंत   सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील  भैरवनाथ शुगर चे व्हाईस चेअरमन  अनिल सावंत जिल्हा प्रमुख गणेश वानकर संभाजी शिंदे महिला आघाडी  जिल्हाप्रमुख  शैलाताई गोडसे साईनाथ भाऊ अभंगराव, संतोष माने, सुधीर अभंगराव ,तुकाराम भोजने तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे महावीर देशमुख शहर प्रमुख सुनील दत्तू रवींद्र मुळे ग्राहक संरक्षण जिल्हा प्रमुख जयवंत माने विधानसभा संघटक विजय कुलकर्णी तालुका समन्वयक श्री शैल कुंभार शहर समन्वयक नारायण गोवे विधानसभा समन्वयक  संजय घोडके, पंढरपूर तालुका प्रमुख पप्पू अभंगराव विनोद कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले, की शिरनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्याबाबत अधिकार्‍यांनी विलंब केल्यामुळे मी बैठक घेतली असता इथल्या आमदारांनी या भागातील प्रश्नाबाबत बैठक घेण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्न उपस्थित केला. यावरून तलावात पाणी सोडण्यास त्याचा विरोध होता असा खळबळजनक आरोप केला. आमदारांना महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचे जनतेला न्याय देण्याचे दायित्व असल्यामुळे तो महाराष्ट्रातील कुठल्याही प्रश्नाच्या संदर्भात बैठक घेण्यासंदर्भात संबंधित खात्याच्या मंत्र्याला विनंती करू शकतो हे विसरले गतवर्षी उजनी धरण शंभर टक्के भरून देखील कालवा सल्लागार समितीच्या नियोजनाअभावी पहिल्यांदाच उजनी मायनस 66 इतके झाले इथल्या दुष्काळाची तीव्रता मला चौथीत असतानाच आहे. परंतु या भागातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून ऊस नसलेल्या भागात साखर कारखाना काढण्याचे धाडस मी स्व. माने सरकारच्या आग्रहाखातर केले. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगार मिळाला. माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. कुणाला पटो अथवा न पटो ज्या अधिकाऱ्यांना पटत नाही त्यांनी बदली करून घेतली आहे पण या भागात माझ्या कार्यकाळात मी हरितक्रांती आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे म्हणाले, की या भागातील प्रश्नासाठी मी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यामध्ये महिला म्हणून मी एकटी नव्हती तर माझ्या मागे तमाम शिवसैनिक व सावंत बंधू होते म्हणून हे आंदोलन करून या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे या भागातील रखडलेल्या प्रश्नासाठी सावंत बंधूच्या मार्गदर्शनाने पाठपुरावा करत आहे.जोपर्यंत सावंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझा लढा व संघर्ष थांबणार नाही शिवाय खोटी आश्वासने देणार नाही यावेळी त्यांनी तालुक्यातील रखडलेले प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.विविध क्षेत्रातील नामवंतांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.

पाणी शिल्लक नाही ही गावे आराखड्यात नाहीत पाण्याचे वाटप झालेले आहे, अशी उत्तरे अधिकाऱ्याकडून ऐकावयास मिळतात. आपण भरलेल्या कराच्या पैशातून आधिकार्याचा पगार दिला जातो हे अधिकारी कदाचित विसरतात. परंतु, मी मंत्री झाल्यावर अवघ्या चार दिवसात 135 सिमेंट बंधारे व 525 गॅबीयन बंधाय्रास मंजुरी देण्याचे काम केले माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे हे कुणाला पटो अथवा न पटो पण माझ्या पतीने मी काम करणार असा सूचक इशारा देखील अधिकाऱ्याने दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com