दक्षिणचा पाणीप्रश्न दक्षिणेतच सुटणार!

सचिन शिंदे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

कऱ्हाड - तालुक्‍याच्या दक्षिण विभागातील जलसंधारणाच्या पाच लहान, मध्यम धरणांचे पाणी घोगावमधील धरणात एकत्रित केल्यास ते पाणी टेंभू विभागामार्फत भागात वितरित करणे शक्‍य आहे. तसे झाल्यास कऱ्हाड दक्षिणेतील पाणी प्रश्न दक्षिणेतीलच पाण्याच्या उपलब्धतेवर मिटू शकतो. त्या अनुषंगाने श्रमिक मुक्ती दलाने मांडलेल्या विचार प्रवाहावर शासनही सक्रिय झाले आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणेला वाकुर्डेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. त्याला शासकीय पातळीवर ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. 

कऱ्हाड दक्षिणेत येणपे, येळगाव, माटेकरवाडी, तुळसण व उंडाळे येथे लहान व मध्यम धरणे जलसंधारण विभागाने बांधली आहेत. त्या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. पाचही धरणांत सुमारे सहा हजार दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध असते. ते पाणी घोगावच्या धरणात एकत्रित केल्यास उपलब्ध होणारा पाणीसाठा मोठा होतो. तेथून उंडाळ्याच्या मध्यम धरणातून ते पाणी दक्षिणेच्या विविध भागात पोचवता येते. असा विचार प्रवाह श्रमिक मुक्ती दल व पाणी संघर्ष समितीने मांडला आहे. त्याला प्राथमिक पातळीवर शासनाचा ‘ग्रीन सिग्नल’ही मिळाला आहे. मात्र, त्याच्या शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास करून योग्य असा ठोस पर्याय शोधणे गरजेचे आहे. घोगावच्या धरणाची सध्याची क्षमता ३१.३३ दशलक्ष घनफूट आहे. त्यातील २१.३३ दशलक्ष घनफूट पाणी वितरित केले जाते. त्या धरणाची भौगोलिक रचना विचारात घेता वरील पाचही मध्यम धरणांचे पाणी एकत्रित केल्यास मोठा पाणी साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दक्षिणेच्या पाण्याची तहान दक्षिणेच्या पाण्यावर भागू शकते, अशी स्थिती आहे.

अशी आहेत, धरणे अन्‌ त्याचा पाणीसाठा 
येणपे - 1834.94 दशलक्ष घनफूट 
येळगाव - 1900 दशलक्ष घनफूट 
माटेकरवाडी - 999 दशलक्ष घनफूट 
तुळसण - 1153 दशलक्ष घनफूट 

Web Title: water issue