water
water

सोलापुरच्या पाण्यावर बिनधास्त डल्ला 

सोलापूर :  सोलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना, शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या टाकळी-सोरेगाव येथील भीमा नदीतून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीतील पाणी लवकरच संपण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. 

एकीकडे औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी येथील भीमा नदीत आठ ते दहा दिवस पुरेल इतके पाणी आहे. सातत्याने होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले असताना, त्यात आता अनधिकृत पाण्याचा उपसा सुरू झाल्याने आणखीनच अडचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. औज बंधारा पूर्णपणे भरल्यानंतर कर्नाटक हद्दीतून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होतो. दैनंदिन 60 ते 70 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. मात्र हा आंतरराज्य प्रश्‍न असल्याने संबंधितांवर काहीच कारवाई करता येत नाही. 

दरम्यान, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी हे पाणी घेतले जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र शहरात तीव्र टंचाई निर्माण झाली असताना, अशा पद्धतीने पाण्याचा उपसा होत असेल तर महापालिकेकडून त्याची दखल का घेतली गेली नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे. 

भीमा नदीतील पाण्याचा उपसा तातडीने थांबविण्याच्या सूचना संबंधित मक्तेदारांना दिल्या आहेत. प्रतिसाद न मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- जी. एन. दुलंगे, सार्वजनिक आरोग्य अभियंता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com