सांगलीत पूर ओसरू लागला; स्वच्छता मोहीम वेगाने

बलराज पवार
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सांगलीत आयर्विन पुलाजवळ सकाळी नऊ वाजता ५४ फूट पाणी होते. अजूनही शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच उपनगरांमध्ये पाणी पातळी चांगलीच आहे. पाणी उतरण्याचा वेग संथ असला तरी एक तासात एक इंच या वेगाने पाणी उतरत आहे. मात्र यामुळे बराच क्षेत्रात असलेले पाणी मागे सरकताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू पूरग्रस्त भाग मोकळा होत चालला आहे. पाऊसही पूर्णपणे थांबला आहे.

सांगली : सांगलीत महापुराचे पाणी  रात्रीत एक फूट ओसरले असून महापालिका क्षेत्रात आता स्वच्छतेचे काम वेगाने सुरू झाले आहे. आज सकाळपासून विविध भागात स्वच्छता सुरू झाली आहे. मात्र अजूनही महत्वाचे रस्ते खुले झालेले नाहीत. आज दुपारनंतर काही रस्ते खुले होण्याची शक्यता आहे.

सांगलीत आयर्विन पुलाजवळ सकाळी नऊ वाजता ५४ फूट पाणी होते. अजूनही शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच उपनगरांमध्ये पाणी पातळी चांगलीच आहे. पाणी उतरण्याचा वेग संथ असला तरी एक तासात एक इंच या वेगाने पाणी उतरत आहे. मात्र यामुळे बराच क्षेत्रात असलेले पाणी मागे सरकताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू पूरग्रस्त भाग मोकळा होत चालला आहे. पाऊसही पूर्णपणे थांबला आहे.

आज सकाळपासून महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पाणी उतरलेल्या भागात स्वच्छता करून तेथे डीडीटी पावडर फवारण्यात येत आहे.

महापालिकेचे कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते स्वच्छतेच्या कामात व्यस्त आहेत. आयएमए, केमिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे पूरग्रस्तांचे तपासणी आणि औषधोपचार सुरू आहेत सोलापूर धुळे पुणे येथून मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूंबरोबरच वैद्यकीय पथकही दाखल झाले आहेत.

शहरातील हिराबाग कॉर्नर कॉलेज कॉर्नर गणपती पेठ बालाजी चौक हे परिसर पूर्णपणे मोकळे झाले आहेत. त्याठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. सध्या राजवाडा चौकात सुमारे पाच फूट, तसेच मारुती चौक, टिळक स्मारक, गावभाग, हरिपूर रोड, सांगलीवाडी या भागात अद्याप पुराचे पाणी आहे. तेथे अडकलेल्या नागरिकांना दूध पाणी फुड पॅकेट्स पुरविण्यात येत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level now reduced in Sangli