कोल्हापुरकरांनो, पंचगंगेची पाणी पातळी ओसरतेय!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पंचगंगेच्या पातळीत साडेतीन फुटांनी घट झाली आहे. पाणी ओसरतंय ही दिलासा देणारी बाब आहे. अखेर एकूण 249 गावांमधनू 48 588 कुटुंबातील 2 लाख 33 हजार 150 व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

कोल्हापूर : पंचगंगेच्या पातळीत साडेतीन फुटांनी घट झाली आहे. पाणी
ओसरतय ही दिलासा देणारी बाब आहे. अखेर एकूण 249 गावांमधनू 48 588 कुटुंबातील 2 लाख 33 हजार 150 व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

यात दिरोळ तालुक्यातील 42 गावांमधनू 30 हजार 565 कुटुंबातील 1 लाख 52 हजार 825 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य सुंख्या पुढीलप्रमाणे-

कागल - 35 गावांतील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 53 सदस्य, राधानगरी – 17 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा – 22 गावातील 87 कुटुंुबातील 333 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य, शाहुवाडी – 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, नशरोळ – 42 गावातील 30 हजार 565 कुटुंबातील 1 लाख 52 हजार 825 सदस्य, हातकणंगले– 21 गावातील 5 हजार 993 कुटुंबातील 26 हजार 758 सदस्य, करवीर – 35 गावातील 5 हजार 101 कुटुंबातील 23 हजार 680 सदस्य, गगनबावडा – 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महानगरपालिकेच्या माध्यमातनू 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level of Panchganga river decreased by 3 feet at Kolhapur