#KolhapurFloods पुणे - बंगळूर महामार्गावर पाण्याची पातळी स्थिर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

शिरोली पुलाची - पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटाजवळ आलेल्या पुराची पाणी पातळी काल रात्रीपासून सकाळी दहापर्यंत साधारणतः एक फूटाने कमी झाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले ; मात्र त्यानंतर महामार्गावरील पाण्याची पातळी स्थिर आहे. महापूराच्या पाण्यामुळे तिसऱ्या दिवशी महामार्ग बंद असून, सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यान महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. त्यामुळे वाहतूक ठप्पच असून, दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाले आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस रात्रंदिवस महामार्गावर बॅरिकेट लावून पहारा देत आहेत. 

राष्ट्रीय महामार्ग ठप्प होऊन तिसरा दिवस उजाडला. रस्त्यारून वाहणारे पाणी सकाळी संथ गतीने कमी होत होते. सकाळी दहापर्यंत महामार्गावरील पाण्याची पातळी साधारणतः एक फूटाने कमी झाली. त्यामुळे पाणी पातळी दिवसभरात कमी होईल अशी अपेक्षा वर्तवली जात होती ; मात्र नेमके उलट घडले. पाण्याची पातळी उतरली नाही, पंरतु वाढली ही नाही व स्थिर राहिली ही समाधानाची बाब.  

सांगली फाटा ते तावडे हॉटेल पर्यंतचा महामार्ग पाण्याखाली असून, महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता वर्त्तवली जात आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः गेल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी उतरत असली, तर महामार्गावरील वाहतूक लवकर सुरू होणे अशक्य आहे.
अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस रात्रंदिवस सेवामार्ग व महामार्गावर बॅरिकेट लावून पहारा देत आहेत. तसेच एनडीआरएफच्या जवानांची एक तुकडी महामार्गावरच थांबून आहे.

महामार्गावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस 
एनडीआरएफच्या जवान, होमगार्ड व वाहतूक बंद असल्यामुळे अडकून पडलेले प्रवासी यांची शिरोलीतील विविध संस्था, तरुण मंडळे व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी चहा, नाष्टा, जेवण यांची सुविधा केली आहे. नैसर्गिक आपत्तीत ही शिरोलीकरांचे प्रेम व आपुलकी पाहून भारावून गेल्याचे एनडीआरएफच्या जवानांने सांगीतले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water level stable on Pune - Bangalore highway