जिल्हा रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट 

शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सातारा - गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कृत्रिम पाणीटंचाईने बेजार झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात त्याची तीव्रता आणखी वाढली आहे. जीवन प्राधिकरणाचा ढिसाळ व संवेदनाहिन कारभार जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. 

जिल्हा रुग्णालयातील रुग्ण, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. साताऱ्यात पाणी नाही म्हणून ही परिस्थिती आलेली नाही. ती आली आहे, जीवन प्राधिकरणाच्या कारभारामुळे. 

गेल्या दोन महिन्यांपासून पाइपलाइन व व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे रुग्णालयाबरोबर कर्मचारी वसाहतीलाही पाणी मिळत नाही. रुग्णालय व्यवस्थापनाला टॅंकरने पाणी आणावे लागत आहे. गेल्या वीस दिवसांत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे याची दाहकता जास्त जाणवत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक उज्ज्वला माने यांनी अनेकदा पाठपुरावा केला. स्वत: संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या. मात्र, काही उपयोग झालेला नाही. 

पाण्याच्या या टंचाईमुळे सर्वात मोठा फटका बसला आहे डायलिसिसच्या रुग्णांना. डायलिसिसची वेळ चुकली की रुग्णाच्या जीवाला धोका बळावतो. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत. आजही जिल्हा रुग्णालयात 375 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. त्यात प्रसूती झालेल्या महिलांचाही समावेश आहे. 

कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात 
पाण्याच्या टंचाईमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. ते कर्मचाऱ्यांनाही पाहवले जात नाहीत. त्यामुळे तातडीने यावर मार्ग न निघाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. 

Web Title: Water problem in District Hospital