शेतकऱ्यांचा पाण्यासाठी टाहो!

- हेमंत पवार
शनिवार, 11 मार्च 2017

उन्हाळ्याच्या तोंडावर कऱ्हाड तालुक्‍यातील दहा गावांत तीव्र टंचाई; दक्षिण मांड नदी आटली

कऱ्हाड - उन्हाळ्याच्या तोंडावरच तालुक्‍यातील दहांहून अधिक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित गावांपैकी काही गावांत तातडीने टॅंकर देऊन पाणी देण्याची व्यवस्था करावी लागेल, अशी स्थिती आहे. दक्षिणेतील दक्षिण मांड नदीच्या काठावरील आठ गावांत टंचाईची स्थिती असल्याने तेथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यातील मसूरच्या पूर्वेकडील व उंडाळ्यासह पाली विभागातील काही गावांत उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तालुक्‍यातील दक्षिण मांड नदीच्या काठावरील उंडाळे, ओंड, नांदगाव, जुजारवाडी, पवारवाडी, म्हारुगडेवाडी, साळशिरंबे व मसूर विभागातील अंतवडी, रिसवड, गोसावेवाडी या गावांमध्ये टंचाईची स्थिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतीसाठी पाणी मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. पिण्याच्या पाण्यासाठीची जुजबी व्यवस्था सुरू आहे.

पवारवाडी, अंतवडी टॅंकरची गरज 
पवारवाडी व अंतवडी येथे सध्या मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथे येत्या काही दिवासांत टॅंकरने पाणी द्यावे लागेल. तेथील लोकांनी तशी मागणीही शासनाकडे केली आहे. 

शासनाकडून फक्त प्रस्तावच 
पाणीपुरवठा विभागाकडून संबंधित टंचाईग्रस्त गावांचा सर्व्हे करून टंचाई आराखडा शासनाकडे पाठवला आहे. त्याला काही महिन्यांचा कालावधी झाला. सध्या टंचाईची स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे पवारवाडीला टॅंकर सुरू करून तेथील लोकांची तहान भागवणे आवश्‍यक असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. शासनाकडून मात्र अजूनही प्रस्तावच सुरू आहेत.

दक्षिण मांड नदीकाठच्या गावांतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. ओंड, नांदगाव, म्हारुगडेवाडीत गंभीर स्थती आहे. पवारवाडीत तर पिण्यासाठी पाणी नाही. तेथे तातडीने टॅंकर सुरू करणे गरजेचे आहे. 
- सागर कुंभार, नांदगाव

Web Title: water problem in karad tahsil