पाणी प्रश्न हा पुर्ण तालुक्याचा प्रश्न आहे - शिवाजी काळुंगे

हुकुम मुलाणी
मंगळवार, 19 जून 2018

मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे. त्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी आयोजित केलेल्या 13 दुष्काळी तालुक्याच्या रौप्य महोत्सवी पाणी परिषदेत लाखाचा समुदाय उपस्थित राहील असा आशावाद पाणी परिषदेचे तालुका अध्यक्ष शिवाजी काळुंगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
 

मंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे. त्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी आयोजित केलेल्या 13 दुष्काळी तालुक्याच्या रौप्य महोत्सवी पाणी परिषदेत लाखाचा समुदाय उपस्थित राहील असा आशावाद पाणी परिषदेचे तालुका अध्यक्ष शिवाजी काळुंगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
 

धनश्री पतसंस्थेच्या कार्यालयात रौप्य महोत्सवी पाणी परिषदेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या रौप्य महोत्सवी परिषदेस वैभव नायकवाडी आ. गणपतराव देशमुख माजी, मंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. भारत भालके यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी बोलताना काळुंगे म्हणाले की, दुष्काळ ग्रस्त भागात स्व. नागनाथ आण्णा नायकवाडी, डॉ. गणपतराव देशमुख, स्व. आर .आर. पाटील आदीनी 24 वर्षापुर्वी हा संघर्ष सुरु केला.

तालुक्याच्या वाटणीचे उजनीचे सहा टी.एम.सी पाणी मिळावे, माण, भिमा, कोरडा नदीच्या कालव्याचा दर्जा द्यावा, टेम्भु म्हैसाळ योजना ह्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करुन निधी मिळवा म्हणून तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातील पाणीप्रश्नाचा विषय या परिषदेत अग्रक्रमाने मांडला जाणार आहे. 
या पत्रकार परिषदेस शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, आणि अॅड. भारत पवार हेही उपस्थित होते.

Web Title: Water problem is the problem of whole tehsil says shivaji kalunge