सोलापूरचा पाणीप्रश्न मिटला; बंधारा 'ओव्हर फ्लो'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

उजनी धरणातून सोडलेले पाणी आज बुधवारी पहाटे दोन वाजता औज बंधाऱ्यात पोचले. दुपारी एक ते दोनच्या दरम्यान औज बंधारा ओव्हर फ्लो होऊन वाहू लागला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंचपूर बंधाराही ओव्हर फ्लो होऊन वाहू लागला. या दोन्ही बंधाऱ्यांत प्रत्येकी साडेचार मीटर पाणी साठविण्यात आले आहे. 

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा होणारे औज आणि चिंचपूर बंधारे ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहेत. त्यामुळे शनिवारपासून (ता. 7) शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे. किमान तीन महिन्यांचा पाणीप्रश्‍न मिटला असल्याने उन्हाळा सुसह्य होणार आहे. 

उजनी धरणातून सोडलेले पाणी आज बुधवारी पहाटे दोन वाजता औज बंधाऱ्यात पोचले. दुपारी एक ते दोनच्या दरम्यान औज बंधारा ओव्हर फ्लो होऊन वाहू लागला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंचपूर बंधाराही ओव्हर फ्लो होऊन वाहू लागला. या दोन्ही बंधाऱ्यांत प्रत्येकी साडेचार मीटर पाणी साठविण्यात आले आहे. 

टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सात वाजता 18 फूट पाणी होते. त्यामुळे या केंद्रातील पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेले चार दिवसांचे रोटेशन शुक्रवारी पूर्ण होत असून, शनिवारपासून नियमित तीन दिवसांआड पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 

Web Title: water problem in Solapur