सोलापूरचा पाणीप्रश्‍न सुटला 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 21 जानेवारी 2019

सोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचले. आज (सोमवार) दुपारी दोन वाजेपर्यंत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तीन मीटर झाली होती. रात्री उशीरापर्यंत बंधारा ओव्हर फ्लो (साडेचार मीटरवरून) होण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचले. आज (सोमवार) दुपारी दोन वाजेपर्यंत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तीन मीटर झाली होती. रात्री उशीरापर्यंत बंधारा ओव्हर फ्लो (साडेचार मीटरवरून) होण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार यंदा पहिल्यांदाच घोषित वेळेच्या आधी एक दिवस पाणी बंधाऱ्यात पोचले आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यांचा पाण्याचा प्रश्‍न तूर्त सुटला आहे. गेल्यावेळेस सोडण्यात आलेले पाणी 5 जानेवारीपर्यंत पुरेल. उजनी धरणातून सोडलेल्या पाणीपुरवठ्यात काही अडथळे आले नाही तर हे पाणी 22 जानेवारीपर्यंत पोचेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात एक दिवस अगोदर पाणी पोचले आहे. 

सोलापूर शहराला सध्या तीन दिवसाआंड पाणीपुरवठा सुरु आहे. औज बंधाऱ्यासह चिंचपूर बंधारा साडेचार मीटरपर्यंत भरून घेतला जाणार आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत शहरात पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. वेळेत पाणी नाही पोचले तर उजनी-सोलापूर योजनेवरून शहराला पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिकेने ठेवली होती. मात्र वेळेआधीच पाणी पोचल्याने महापालिका प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. 

उपशावर हवे नियंत्रण 
बंधारा भरला की लगेच महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांकडून पाण्याचा उपसा सुरु होतो. पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून महाराष्ट्र हद्दीतील नदीकाठच्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला जातो. कर्नाटक हद्दीत मात्र चोवीस तास वीजपुरवठा सुरु असतो. त्यामुळे त्या परिसरातून होणाऱ्या उपशावर नियंत्रण ठेवले तर, पाण्याचा साठा झपाट्याने कमी होणार नाही. 

Web Title: water problem solved in solapur