इंदापूर तालुक्यातील चार गावामध्ये पाणी शुद्धिकरणाची यंत्रणा धुळखात

राजकुमार थोरात
शनिवार, 8 डिसेंबर 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातीलमध्ये जलस्वराज प्रकल्पाअतंर्गत सुरु असलेल्या चार गावातील पाणी शुद्धिकरण प्रकल्पाचे काम रखडले आहे. पाणी शुद्धिकरणाचे लाखो रुपयांचे साहित्य येथे धूळ खात पडले आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातीलमध्ये जलस्वराज प्रकल्पाअतंर्गत सुरु असलेल्या चार गावातील पाणी शुद्धिकरण प्रकल्पाचे काम रखडले आहे. पाणी शुद्धिकरणाचे लाखो रुपयांचे साहित्य येथे धूळ खात पडले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या माध्यामतुन जलस्वराज प्रकल्प योजना - २ अंतर्गत इंदापूर तालुक्यातील सात गावांचा समावेश होता. यातील रणगाव, शेळगाव निमसाखर या गावातील जलशुद्धिकरण प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत. यातील नीरा नदी काठच्या पिठेवाडी, बोराटवाडी, निरवांगी व घोरपडवाडी गावामधील जलशुद्धीकरणाची कामे रखडली आहेत. पाणी शुद्धीकरण योजनेसाठी लागणाऱ्या मशिन, फिल्टर व टाक्या गावामध्ये आल्या असून, गेल्या तीन -चार महिन्यापासुन ग्रामपंचायत कार्यालय व गावामध्ये धुळ खात पडल्या आहेत. नीरा नदीकाठच्या गावामध्ये  क्षारयुक्त पाणी असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावे लागते. 

यामुळे जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी पिठेवाडीच्या सरपंच नंदादेवी विजयसिंह बंडगर, निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ, दत्तात्रेय पोळ यांनी केली आहे. संदर्भात पुणे जिल्हा परिषदेच्या समाजव्यवस्थापन अधिकारी शुभांगी काळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी, या योजनेतंर्गतची कामे करण्यासाठी राज्यस्तरावरुन ठेकेदारांची नेमणूक झाली असल्याचे सांगितले. या ठेकेदाराने जिल्हा परिषदेने तातडीने कामे पूर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या असून लवकरच कामांना सुरवात होईल असे सांगितले. 

जलस्वराज योजनेतंर्गत रखडलेल्या गावांची नावे व मंजूर निधी...
पिठेवाडी (१० लाख ७८ हजार ५१३ रुपये), बोराटवाडी (१४ लाख १९ हजार ११३ रुपये), घोरपडवाडी (१४ लाख १९ हजार ११३ रुपये), निरवांगी (१४ लाख ३६ हजार ५१७ रुपये)

Web Title: water purification system is not working in four villages of Indapur taluka