मागणी नसतानाही सोडले उजनीतून पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नियोजनाच्या अभावामुळे होतोय पाण्याचा अपव्यय

सोलापूर - उजनी धरणातून सिंचनासाठी आजपासून पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. मुख्य कालव्यातून सकाळी दीड हजार तर दुपारपासून त्यामध्ये वाढ करत तीन हजार 200 क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी नसतानाही पाणी सोडल्यामुळे पाटबंधारे विभागामध्ये नियोजनाचा अभाव दिसत आहे. नियोजनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. 

उजनी धरणातून सिंचनासाठी 20 फेब्रुवारीला पाणी सोडले होते. कालव्यातून सोडलेले हे पाणी 31 मार्चपर्यंत चालू होते. म्हणजे जवळपास 39 दिवस उजनीतून कालव्यात पाणी सोडले जात होते. त्यानंतर पाटबंधारे विभागाने मागील दोन दिवसांपूर्वी पाणी मागणीच्या संदर्भात दैनिकांमध्ये प्रसिद्धीकरण दिले. उन्हाळ हंगामासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करायचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 24 एप्रिलपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करण्यासही पाटबंधारे विभागाने सांगितले होते. प्रसिद्धीकरण दिल्यानंतर केवळ दोनच दिवसात कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. कालव्यातून 20 मार्चला सोडलेले पाणी 31 मार्चला बंद केले होते. त्यानंतर केवळ 11 दिवसातच पुन्हा कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. 

खरेतर शेतकऱ्यांनी पाण्याची मागणीच केली नाही. तरीही उजनीच्या प्रशासकाने पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी देण्यास सुरवात केली आहे. सिंचनासाठी पाण्याची गरज नसताना दुर्मिळ असलेली पाण्यासारखी संपत्ती वाया घालविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. मंत्रालयातून आदेश आल्यामुळे आम्ही सिंचनासाठी पाणी सोडल्याचे कार्यकारी अभियंता ए. पी. सोनेवार यांनी "सकाळ'ला सांगितले. 

उजनीच्या पाण्याचे केलेले नियोजन पूर्णतः चुकीचे आहे. 20-25 एप्रिलला पाणी सोडणे गरजेचे होते. पण आता मागणी नसतानाही पाणी सोडून ते वाया घालविण्याचे काम पाटबंधारे विभागाचे अधिकारी करत आहेत. पालकमंत्री व आमदारांनीही याबाबत विश्‍वासात घेतले नाही. 
- भारत भालके, आमदार. 

Web Title: water release in ujani dam