वीर धरणातून सोडलेले पाणी हिळ्ळी बंधाऱ्यात दाखल 

राजशेखर चौधरी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

अक्कलकोट - वीर धरणातून मागील आठवड्यात सोडलेले पाणी काल ता.२० रोजी सायंकाळी हिळ्ळी बंधाऱ्यात दाखल झाले आहे. दरम्यान या बंधाऱ्यात दोन मीटर उंचीपर्यंत प्लेट टाकण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता या बंधाऱ्यातून १२ हजार क्यूसेक्स प्रति सेकंद इतक्या वेगाने पाणी खाली कर्नाटक हद्दीत जात आहे.

अक्कलकोट - वीर धरणातून मागील आठवड्यात सोडलेले पाणी काल ता.२० रोजी सायंकाळी हिळ्ळी बंधाऱ्यात दाखल झाले आहे. दरम्यान या बंधाऱ्यात दोन मीटर उंचीपर्यंत प्लेट टाकण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता या बंधाऱ्यातून १२ हजार क्यूसेक्स प्रति सेकंद इतक्या वेगाने पाणी खाली कर्नाटक हद्दीत जात आहे.

सध्याची पाण्याच्या प्रवाहाची स्थिती आणि वेग हा जास्त आहे त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहे. हिळ्ळी बंधाऱ्याच्या वरील बाजूस असणारे खानापूर आणि आळगे (हिंगणी) या दोन्ही बंधाऱ्यात पाणी काल सायंकाळी पोचले. सध्या या बंधाऱ्यात एक मीटर उंचीपर्यंत प्लेट्स टाकण्यात आले आहेत. जूलै महिन्यात खानापूर आणि हिळ्ळी या दोन्ही बंधाऱ्यावर भीमा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अभियंता एन ए जडे आणि शाखा अभियंता प्रफुल्ल ढवळे हे याकामी लक्ष ठेऊन प्लेट्सचा प्रश्न मार्गी लावल्याने पाणी साठा पूर्ण क्षमतेने राहणार आहे.

मागील मे महिन्यापासून अक्कलकोट तालुक्यातील संबंधित कर्नाटकचा आळगे बंधारा,खानापूर आणि हिळ्ळी बंधारा ही तिन्ही बंधारे पूर्णतः कोरडी झाली होती.मागील वर्षी चांगल्या पावसाने नदीकाठच्या गावात प्रचंड प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे.सध्या या तिन्ही बंधारा क्षेत्रात ऊसाला, जनावरांच्या चारा पाणी व पिण्याच्या पाण्यासाठीची टंचाई तीव्र जाणवत होती.दरम्यान कालपासून येत असलेल्या पाण्याने शेतकरी व नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.वीर धरणावरील तिन्ही धरणे भरल्याने तिथून पाणी सोडणे सुरू आहे.याचा परिणाम म्हणून कालपासून आळगे (हिंगणी), खानापूर व हिळ्ळी या तिन्ही बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.बंधाऱ्याला नवीन प्लेट्स बसविल्याने पाण्याची दरवर्षी होणारी गळती यावेळी पूर्णतः थांबणार आहे.यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: The water released from the Vir Dham