पाणीदार कटगुणसाठी ‘सकाळ’चे पाऊल मोलाचे - दादासाहेब कांबळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

खटाव - महात्मा फुले यांची कुलभूमी असणारे कटगुण गाव पाणीदार करण्यासाठी ‘सकाळ’ने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तलावातील गाळ काढल्यामुळे पाणीटंचाईवर मात करता येणार आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

खटाव - महात्मा फुले यांची कुलभूमी असणारे कटगुण गाव पाणीदार करण्यासाठी ‘सकाळ’ने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तलावातील गाळ काढल्यामुळे पाणीटंचाईवर मात करता येणार आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

कटगुण (ता. खटाव) येथे तनिष्का गटाच्या माध्यमातून व सकाळ रिलीफ फंडातून तलाव्यातील गाळ काढण्याच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गटविकास अधिकारी नरेंद्र मेंढेवार, माजी सरपंच हणमंतराव गायकवाड, किसन गायकवाड, प्रा. प्रल्हाद गायकवाड, शरद गायकवाड, संदीप गोरे, प्रकाश वाडेकर, प्रल्हाद गोरे, ‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक संजय शिंदे, तनिष्का व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री. कांबळे म्हणाले,‘‘ तनिष्का व्यासपीठाच्या महिलांमुळे गावागावांत जलसाक्षरता रुजू लागली आहे. महिलांच्या माध्यमातून पाण्यासाठी काम होत आहे, ही चांगली बाब आहे.’’ 

श्री. शिंदे यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी तनिष्का सुषमा गायकवाड, वनश्री कदम, राणी सुतार, शारदा गायकवाड, कल्पना गायकवाड, शोभा गोरे, रुक्‍मिणी गायकवाड, शोभा नामदेव गोरे, यशोदा गायकवाड, शुभांगी गायकवाड, शुभांगी विजय गायकवाड, शीतल गायकवाड, जयश्री गायकवाड, रेश्‍मा गायकवाड, अनिता गायकवाड, सुजाता गायकवाड, स्वाती गायकवाड, शोभा गायकवाड, आशालता गायकवाड, रेखा पवार उपस्थित होत्या. डॉ. विवेक गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: water sakal dadasaheb kamble sakal relief fund