आटपाडी पश्‍चिमेकडील गावात विहीर, हातपंप, तलाव कोरडे ठणठणीत

सदाशिव पुकळे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

झरे - आटपाडी पश्‍चिमेस विभूतवाडी,  कुरुंदवाडी, गुळेवाडी, तरसवाडी, पिंपरी बुद्रुक या गावांत तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. विभूतवाडी, कुरुंदवाडी, पिंपरी बुद्रुक या ग्रामपंचायतींनी टॅंकरची मागणी केली आहे.

झरे - आटपाडी पश्‍चिमेस विभूतवाडी,  कुरुंदवाडी, गुळेवाडी, तरसवाडी, पिंपरी बुद्रुक या गावांत तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. विभूतवाडी, कुरुंदवाडी, पिंपरी बुद्रुक या ग्रामपंचायतींनी टॅंकरची मागणी केली आहे.

सध्या विहिरी, हातपंप, तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी दीड-दोन किलोमीटरवरून पायपीट करावी लागत आहे. जवळपासचे पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत. याचे शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरिपाची पेरणी कमी प्रमाणात झाली, तर रब्बीची पेरणी झाली नाही. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध झाला नाही. सध्या जनावरे जगविणे अवघड झाले आहे. 

या परिसरात उसाचे वाडे मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहे. उसाच्या वाड्याचाच चारा उपलब्ध होत आहे. सद्यस्थितीत २० गरे वाड्याची पेंडी १० रुपयाला मिळते आहे. यामुळे जनावरांची फक्त आशा मोडवाण होते, पोटभर चारा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरे जगविण्याचा मोठा गंभीर प्रश्न पडला आहे. दुभत्या जनावरांना मका २५०० रुपये  गुंठाप्रमाणे असून ठरािवकच शेतकरी चारा घेत आहेत.

उसाचे वाडे २० गऱ्याची एक पेंडी १० रुपयाला मिळते. त्याच्यावर जनावराचे पोट भरत नाही. चारा विकत तरी किती दिवस घालणार ? तेवढे पैसे तरी नकोत का ? शासनाने चारा डेपो सुरू करावा.
- विजय माने,
पिंपरी बुद्रुक.

Web Title: Water Scarcity in Atpadi Taluka