#WaterScarcity चारा न्हाय....प्यायला पाणी न्हाय..आटपाडीकरांची व्यथा

नागेश गायकवाड
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

आटपाडी - दोन वर्षापासून पाऊस न्हाय...चारा न्हाय....प्यायला पाणी न्हाय....शेतात पेरल्यालं उगवलं न्हाय... पिक वीमा मिळाला न्हाय...हाताला काम नसल्यानं गावातील लोकं गाव सोडून चालल्याती बघा असं गाऱ्हाणं आटपाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकाकडे मांडले.

आटपाडी - दोन वर्षापासून पाऊस न्हाय...चारा न्हाय....प्यायला पाणी न्हाय....शेतात पेरल्यालं उगवलं न्हाय... पिक वीमा मिळाला न्हाय...हाताला काम नसल्यानं गावातील लोकं गाव सोडून चालल्याती बघा असं गाऱ्हाणं आटपाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकाकडे मांडले.

आटपाडी (जि. सांगली) येथून गुरुवारी (ता. 6) दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सकाळी 11 च्या सुमारास पात्रेवाडा येथे आले. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर, महसूलचे उपायुक्त प्रताप जाधव, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, निवासी जिल्हाधिकारी त्रिगूण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, कृषी अधिक्षक अधिकारी राजेंद्र साबळे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या पथकामध्ये निती आयोगाचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, एम. जी. टेंभूर्णे, चाऱ्याचे विशेष तज्ज्ञ विजय ठाकरे यांनी तालुक्‍यातील पात्रेवाडी, लेंगरेवाडी, मानेवाडी, माडगुळे, मुढेवाडी आणि निंबवडे या गावातील जळालेले पिक, कोरड्या विहिरी ची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार असल्याने प्रत्येक गावातील शेतकरी केंद्राच्या पथकाची वाट पाहत होते. पथक आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं व्यथा मांडल्या. यंदा पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरलंल उगवलंच नाय. त्यामुळं जित्राबाला चारा मिळत न्हाय. डाळिंबाला 2000 रुपयापासून 3500 रुपयांपर्यंत विकत पाणी आणून घालतुया. शेतीला आणि प्यायलाच पाणी मिळणा, मग जित्राबाला कुठणं आणायचं. आमच्यावर गाव सोडण्याची वेळ आल्या. मेंढपाळ गाव सोडून गेल्यात, आणि ऊस तोडणीसाठी स्थलांतर वाढ लागलय. 

कसला पिक इमा अनऔ्‌ कसं काय.

केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत शेतकऱ्यांकडे विचारणा केली या प्रश्‍नाला शेतकरी उत्तर देताना म्हणाले, कसला पिक इमा अनऔ्‌ कसं काय... पैक भरलं पण नुकसान झाल्याचं मोबदलाच न्हाय. कर्ज फेडायचं कसं.

एक नजर
* प्रत्येक गावात दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी वेळ दिला
* थेट शेतकऱ्यांशी संवाद साथला
* चारा डेपो सुरु करा
* टेंभूच्या पाण्याने तलाव, ओढ्यावरील बंधारे भरावेत
* उदरनिर्वाहसाठी नरेगाची कामे सुरु करा
* कर्जमाफी द्यावी
* खरीप, रब्बी, डाळिंबाची नुकसान भरपाई द्यावी 

Web Title: Water Scarcity in Atpadi Taluka