पाण्यासाठी दिवसभर बादलीचं ओझं!

अशोक मुरुमकर
बुधवार, 18 एप्रिल 2018

सोलापूर - हातात काठी... उन्हामुळं डोक्‍याला बांधलेली टाफर... बगलेत मळकट पिशवी त्यात पाण्याची बाटली, दुपारची भाकर व पाण्यासाठी बादली... हे चित्र आदिवासी भागातील नाही, तर सोलापूर जिल्ह्यातील कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील आहे. गेल्यावर्षी पाऊस चांगला पडला असला तरी येथे आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

शेळ्यांना चारा तर नाहीच; पण पाणी मिळावे म्हणून बादली घेऊन त्यांच्या मागे फिरावे लागत आहे. राज्यात 2017 मध्ये सुरवातीपासूनच चांगला पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीपातळीत चांगली वाढ झाली.

सोलापुरात सरासरी 1.38 मीटरने भूजल पातळी वाढली. उत्तर सोलापूरमध्ये 1.02 मीटरने पाणीपातळी वाढली. मात्र, आता येथे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. चार-पाच वर्षांत पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. पिण्यालाही पाणी मिळत नव्हते, चारा नसल्याने अनेकांनी गाय, बैल व म्हैस अशी मोठी जनावरं विकली. काहींनी शेळ्या घेतल्या. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने उन्हाळ्यात पाणी पुरेल अशी आशा होती. पण एप्रिलमध्येच उत्तर सोलापुरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. चाऱ्यासाठी शेळ्यांना वणवण करावी लागत आहे.

हिरवा चारा तर नाहीच, झाडाझुडपांचा पाला खाऊन शेळ्या जगत आहेत. त्यांच्या मागे फिरत विहीर दिसली की त्यातून पाणी शेंदून (बादलीला दावं बांधून) काढायचं अन्‌ शेळ्यांना पाजायचे. गावात सर्वजण अशीच बादली घेऊन दिवसभर फिरतात.
- हासीम शेख

Web Title: water shortage bucket