पाणी नाही, माणसांच्या अडवण्याने दुष्काळ - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

जत - 'पाणी आडवा, पाणी जिरवा' असा संदेश दिला. पण पन्नास वर्षांत पाणी नाही लोकांना अडवून जिरवण्याचे काम झाले म्हणून दुष्काळ कायम राहिला. गाव एक झाले तर दुष्काळमुक्ती होऊ शकते हे आवंढी व बागलवाडीने दाखवून दिले. त्यांचे काम राज्यातील अन्य गावांना दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी जत तालुक्‍यातील गावांना भेटी देऊन फडणवीस यांनी येथे श्रमदान केले. ते म्हणाले, की 11 हजार गावे दुष्काळाने होरपळली. टॅंकरने बजबजली. पाण्याचे विज्ञान समजून घेऊन जलयुक्त शिवारसारखी योजना आम्ही आणली. मदतीला पाणी फाउंडेशन धावून आले. गेल्या वर्षी सहा हजार गावे दुष्काळमुक्त झाली. उर्वरित या वर्षी होतील. लोकांना पाण्याचे महत्त्व समजले. वाहून जाणारे थेंब न्‌ थेंब पाणी अडवायच्या ध्येयाने जनता झपाटली. पाणी लोकांची जात, धर्म व पक्ष बनले.

आमदार विलासराव जगताप यांनी कामासाठी डिझेलची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. त्याची व्यवस्था लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले...
- योजना गावची होत नाहीत तोपर्यंत यश नाही.
- दुष्काळमुक्तीची मानसिकता बनली पाहिजे.
- विज्ञान समजून घेऊन कामे केल्यास दुष्काळ दूर होईल.
- प्रेम करून कष्ट करणारांना निसर्ग भरभरून देतो.
- या वर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील.

Web Title: water shortage drought devendra fadnavis