सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

काशीळ - जिल्ह्यातील माण, खटाव पाणीटंचाई वाढू लागली आहे. या दोन तालुक्‍यांतील सहा गावे व १५ वाड्या वस्त्यांवरील चार हजार ९९५ लोकसंख्येस पाच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

काशीळ - जिल्ह्यातील माण, खटाव पाणीटंचाई वाढू लागली आहे. या दोन तालुक्‍यांतील सहा गावे व १५ वाड्या वस्त्यांवरील चार हजार ९९५ लोकसंख्येस पाच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ होऊ लागली आहे. त्यामध्ये माण व खटाव या दुष्काळी तालुक्‍यांतील सहा गावांत व १५ वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनास टॅंकर सुरू करावे लागले आहेत. त्यामध्ये माण तालुक्‍यात पाच गावे व १४ वाड्यावस्त्यांवर चार टॅंकरद्वारे, तर खटाव तालुक्‍यातील एक गाव व एका वाडीवस्तीवर एका टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याचे पाणी संरक्षित ठेवण्यासाठी या दोन तालुक्‍यांतील पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाची तिव्रता वाढू लागल्याने जलसाठे पाणी कमी होऊ लागल्याने पाणीटंचाईत वाढ होऊ लागली आहे. मे महिन्यात टंचाईत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी जाणवत असली, तरी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाईत वाढ होऊ लागली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी टंचाई
जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून पाणीटंचाई वाढ होऊ लागली असलीतरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र कमी प्रमाणात टंचाई या उन्हाळ्यात जाणवत आहे. गेल्या वर्षी २० एप्रिल रोजी ४५ टॅंकरद्वारे ४६ गावे २८३ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात होता. यावर्षी मात्र केवळ सहा गावे व १५ वाड्यावस्त्यांवर पाच टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा व फलटण तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पाणीटंचाई कमी मदत झाली आहे.

Web Title: water shortage increase