बागायती भागातही पाण्यासाठी पायपीट!

हेमंत पवार
शनिवार, 8 एप्रिल 2017

कऱ्हाड  - कृष्णा-कोयना या बारमाही वाहणाऱ्या नद्या लाभलेल्या कऱ्हाड तालुक्‍यात यंदा मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ‘नदी आहे उशाला आणि कोरड पडली घशाला’ अशीच स्थिती सध्या अनेक गावांत दिसते. 

४६ गावांतून टंचाईग्रस्त गावे जाहीर करावीत, असे ठराव देण्यात आलेत. अनेक गावांत सध्या चार ते पाच दिवसांतून  एकदाच पाणी येते. आवश्‍यकता असतानाही अनेक ठिकाणी टॅंकर सुरू करण्यात आलेले नाहीत. शासनाकडून टंचाईतील उपाययोजनांसाठी दमडीचाही निधी अद्याप प्राप्त झाला नाही.    

कऱ्हाड तालुक्‍याच्या पूर्व व दक्षिणेतील गावांमध्ये पाण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. अनेक गावांतील विहिरींची पाणीपातळी खाली गेल्याने दोन ते चार दिवसांतून एकदाच पाणी येत आहे. त्याचबरोबर पवारवाडी-नांदगाव, बामणवाडी, मनव, गोसावेवाडी, भोसलेवाडी, मस्करवाडी, चोरजवाडी, वनवासमाची आदी गावांत भीषण टंचाई आहे. तेथे पिण्यासाठी पाणीच नाही अशी स्थिती आहे. घोलपवाडी, कोरीवळे, किवळ, अंतवडी, घारेवाडी, निगडी आदी गावांतही टॅंकर सुरू करण्याची गरज आहे. टॅंकरच्या मागणीचे प्रस्तावही प्राप्त झालेत. मात्र, त्याची कार्यवाही झालेली दिसत नाही. परिणामी लोकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील जुजारवाडी येथे गेल्या वर्षभरापासून खासगी विहिरीतून पाणीपुरवठा सुरू आहे. ६०० लोकसंख्येच्या या वाडीमध्ये शासनाकडून पाणीपुरवठा करण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे.

सध्या तालुक्‍यातील ४६ गावांना टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करावे, यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव दाखल झालेत. त्याचबरोबर ४१ गावांत नवीन विंधन विहीर घेणे, भवानवाडी, भुरभुशी, गायकवाडवाडी, पाल, यादववाडी, लटकेवाडी गावांतील नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे, अंतवडी, बामणवाडी, रिसवडतील विहिरी अधिगृहण कराव्या लागणार आहेत.  

टंचाईग्रस्त गावांची नावे...
कालेटेक, जुजारवाडी, चचेगाव, नांदगाव, पवारवाडी, मनव, बामणवाडी, शिबेवाडी, ओंड, घारेवाडी, अंतवडी, रिसवड, गोसावेवाडी, किवळ, सयापूर, करंजोशी. 

टॅंकरची गरज असलेली गावे...
पवारवाडी-नांदगाव, बामणवाडी, मनव, गोसावेवाडी. 
विहीर अधिग्रहण (ग्रामपंचायत पातळीवर)
अंतवडी, घारेवाडी, भोळेवाडी, कालेटेक, जुजारवाडी.

Web Title: water shortage in karad