मंगळवेढा : 39 गावातील जनतेची ऐन दुष्काळात पाण्यासाठी भटकंती

drought
drought

मंगळवेढा : 39 गावाच्या भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन फुटल्यामुळे गेल्या चार दिवसापासून 39 गावातील जनतेला ऐन दुष्काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून या वर्षात अजून ट्रायल बेस असून पाईप फुटण्याच्या प्रकाराने या योजनेच्या पुढील भवितव्याबाबत यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले.

आ. भारत भालके यांनी पाठपुरावा पाठपुरावा करत लोकवर्गणीची अट रद्द करून दक्षिण भागातील 39 गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून  71 कोटी खर्चून भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली उचेठाण बंधाऱ्यातून उचलेले पाणी जुनोनी जवळ शुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून 39 गावातील नागरिकांना चार झोन च्या माध्यमातून पिण्यासाठी पुरवले आहे यामध्ये उचेठाण पासून जुनोनी पर्यंत शेतकऱ्यांनी ही पाईपलाईन तीन ठिकाणी फोडली तर भोसे आणि मारोळी जवळ दोन ठिकाणी वितरिका फोडल्यामुळे या भागातील जनतेला पाणी मिळू शकले नाही. पण ह्या दोन झोनशिवाय अन्य गावाला पाणी देणे आवश्यक होते परंतु संबंधित विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत दुष्काळात पाणी पाणी करण्याची वेळ आणली.

काही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाय्राच्या निष्काळजीमुळे टाक्या ओव्हरपूल होवून पाणी वाया जाण्याचे प्रकार होत आहेत. पाईपलाईन ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून गेले त्या शेतकऱ्यांना पाईपलाईन जमिनीखाली असल्याची माहिती असताना देखील या योजनेची पाइपलाइनची फोडण्याचे प्रकार घडत असताना संबंधित अधिकारी किंवा यंत्रणा झोपेचे सोंग का घेत आहे असाही सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे या योजनेतील 39 गावात गावातील वाडी-वस्तीवर टॅंकरने पाण्यासाठी 39 टँकर दररोज या ठिकाणी भरण्यासाठी येत असतात पण त्यांनाही हे पाणी मिळाले नाही.मंगळवारी संध्याकाळी विद्युत पुरवठा खंडित तर बुधवारी शटडाऊन घेतले तर गुरुवारी  मोटरीत बिघाड झाल्यामुळे  हे पाणी मिळू शकले नाही  या योजनेवर कार्यरत असणारे अधिकाऱ्यांनी फोन स्विच ऑफ ठेवल्यामुळे विचारायचे कोणाला त्यामुळे पाणी कधी येणार हा प्रश्न मात्र या भागातील जनतेसमोर अनुत्तरीत राहिला.मुख्यमंत्र्याच्या सरपंचाशी झालेल्या थेट संवादात देखील या योजनेच्या विस्कळीतपणाची तक्रार नोंदवण्यात आली.

39 गावातील पाणीपुरवठ्याची स्थिती लक्षात घेऊन भगीनीच्या डोक्यावरील हंडा कमी करण्यासाठी आ.भालके यांनी ही योजना राबवली पण अधिकाऱ्याच्या योग्य नियोजनाअभावी ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात येण्या अगोदरच अशी अवस्था आहे .सध्या तालुक्यात अन्य योजना विचारात घेता तर भविष्यात याची अवस्था कशी राहणार.या योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत ठेवावी
- पांडूरंग चौगुले, भाळवणी

मुख्य पाईपलाईनचे तीन ठिकाणी तर वितरिका दोन ठिकाणी फुटली शिवाय खंडीत वीजपुरवठा व शटडाऊन आणि मोटर जळणे यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. उद्यापासून दि.12 पासून पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- उमाकांत माशाळे, अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com