शिराळा उत्तरेत पाण्यासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

चार-पाच दिवसांतून एकदाच पाणी; तेही येते कमी दाबाने 

शिराळा - शिराळा तालुक्‍यातील उत्तर भागातील कोंडाईवाडी, धामवडे, वाकुर्डे बुद्रुक, गिरजवडे, वाकुर्डे खुर्द, बेलदारवाडी, खेड या गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

रेड गावाजवळील तलावाखाली असणाऱ्या गाव विहिरीतून पाणी पुरवठा होत असून गेली दीड महिन्यापासून विहिरीला पाणी कमी पडत असल्यामुळे पाणी टंचाईच्या झळा बसत असून चार-पाच दिवसांतून एकदाच पिण्याचे पाणी व तेही कमी दाबाने मिळत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे.

ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मस्कर, योगेश मस्कर, मारुती घारगे आदींसह ग्रामस्थांनी आमदार शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन गेली दीड महिन्यापासून बेलदारवाडी गावात चार दिवसांतून एकदाच पाणी मिळत होते तेही २३ फेब्रुवारी पासून वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे व महिलांचे पाण्यासाठी मोठे हाल होत असल्याची व्यथा मांडली. 

गिरजवडे येथील विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने लोकांना दोराच्या सहाय्याने पाणी वर काढून दूषित पाणी प्यावे लागत आहे. यावेळी आमदार नाईक यांनी या घटनेची गांभीर्याने  दखल घेत बेलदारवाडी गावासह अन्य गावांत असणाऱ्या पाणीटंचाईबाबत तसेच वाकुर्डे योजनचे पाणी शिराळा व वाळवा तालुक्‍याला मिळण्याबाबत तातडीने बैठक बोलविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

ठरावाकडे दुर्लक्ष 
गावाला नेहमीच उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच पाणी टंचाई भासते. बेलदारवाडी ग्रामपंचायतीने २६ जानेवारी रोजीच्या ग्रामसभेमध्ये ठराव करून टॅंकरची मागणी  केली होती. मात्र, अध्यापही प्रशासनाने याबाबत  कसलीही दखल घेतलेली नाही.

Web Title: water shortage in shirala