राधानगरी धरणात 7.11 टीएमसी पाणीसाठा; 30 बंधारे पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 2.32  टीएमसी, वारणा 25.31 टीएमसी, दूधगंगा 13.31 टीएमसी, कासारी 2.29 टीएमसी, कडवी 2.27 टीएमसी, कुंभी 2.10 टीएमसी, पाटगाव 2.78 टीएमसी, चिकोत्रा 0.85 टीएमसी, चित्री 1.38 टीएमसी, जंगमहट्टी 1.10 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल पा) 0.21 टीएमसी असा आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 7.11 टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, बालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, व यवलूज. तुळशी नदीवरील- बीड. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडेली, चावरे, मांगलेसावर्डे, काखे, तांदुळवाडी, शिरगाव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव व पाटणे असे एकूण 30 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 62.41 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 118.727 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 2.32  टीएमसी, वारणा 25.31 टीएमसी, दूधगंगा 13.31 टीएमसी, कासारी 2.29 टीएमसी, कडवी 2.27 टीएमसी, कुंभी 2.10 टीएमसी, पाटगाव 2.78 टीएमसी, चिकोत्रा 0.85 टीएमसी, चित्री 1.38 टीएमसी, जंगमहट्टी 1.10 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल पा) 0.21 टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.10 फूट, सुर्वे 31 फूट, रुई 60.9 फूट, इचलकरंजी 58 फूट, तेरवाड 47 फूट, शिरोळ 41.6 फूट, नृसिंहवाडी 42 फूट, राजापूर 30.9 फूट तर नजीकच्या सांगली  21.6 फूट आणि अंकली  24.11 फूट अशी आहे.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 79.50 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 8.43 मिमी पाऊस
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 79.50 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 8.43 मिमी पावसाची नोंद झाली. आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- हातकणंगले- 14.25 मिमी एकूण 300.38 मिमी, शिरोळ- 8.43  मिमी एकूण 236.29  मिमी, पन्हाळा- 40.57 एकूण 845 शाहूवाडी- 50.50 मिमी एकूण 1190.17 राधानगरी- 48 मिमी एकूण 1088.17 मिमी, गगनबावडा- 79.50 मिमी एकूण 2666 मिमी, करवीर- 37.18 मिमी एकूण 645.73 मिमी, कागल-  31.57 मिमी एकूण 632 मिमी, गडहिंग्लज- 15.86 मिमी एकूण 460.86 मिमी, भुदरगड- 49.60 मिमी एकूण 906.80 मिमी, आजरा- 31.75 मिमी एकूण 1188.50  मिमी, चंदगड- 16.33 मिमी एकूण 1149 मिमी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water storage in Radhanagri dam at Kolhapur