कोल्हापूर शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

एक नजर

  • बालिंगा येथील ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती करण्याचे काम गुरुवारी (ता. २) हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डातील पाणीपुरवठा राहणार बंद. 
  • शुक्रवारी (ता. ३) देखील अपुरा पाणीपुरवठा.
  • महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची पत्रकाद्वारे माहिती. 

कोल्हापूर - बालिंगा येथील ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती करण्याचे काम गुरुवारी (ता. २) हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. ३) देखील अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.

संपूर्ण ए वॉर्ड, फुलेवाडी, रिंगरोड परिसर, लक्षतीर्थ वसाहत परिसर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, आपटेनगर, सानेगुरुजी वसाहत, तुळजाभवानी कॉलनी परिसर, तलवार चौक परिसर, हरिओमनगर, जुना वाशी नाका परिसर, शिवाजी पेठ परिसर, सरनाईक कॉलनी, राजकपूर पुतळा परिसर, जावळाचा गणपती परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, बिंदू चौक परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, जुना बुधवार तालीम परिसर येथे पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच संपूर्ण सी आणि डी वॉर्ड येथेही या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply closure in Kolhapur city Thursday