सोनईसह अठरा गावांची पाणीपुरवठा योजना सुरू 

SONAI WATHER SUPPLAY
SONAI WATHER SUPPLAY

सोनई : सुमारे 55 लाख रुपये थकीत वीजबिलामुळे बंद केलेली सोनईसह 18 गावांची पाणीयोजना अखेर सुरू झाली. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या प्रयत्नांना यश आले. 

सोनईसह करजगाव, शिरेगाव, अंमळनेर, गणेशवाडी, तामसवाडी व अन्य गावांना गेल्या सहा दिवसांपासून पाणी मिळत नव्हते. कुठल्याच ग्रामपंचायतीने पर्यायी व्यवस्थाही केली नाही. त्यामुळे 18 गावांतील 60 हजार ग्रामस्थांवर "पाणी.. पाणी..' करण्याची वेळ आली होती. पिण्यासह वापराच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. 

कोरोना विषाणूसंसर्गाची भीती लक्षात घेऊन विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. त्यामुळे वीजबिलाच्या थकबाकीचा विषय बाजूला ठेवून पाणीयोजना सुरू करण्याच्या सूचना मंत्री गडाख व सुनील गडाख यांनी महावितरणला केल्या. वीज वितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपाल जनवीर यांच्याशी गडाख यांनी संपर्क साधला. त्यानंतर मंगळवारपासून (ता. 24) पाणीयोजना सुरू झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com