पाणीसाठ्याचे नियोजन थोडे फसलेच! 

जालिंदर सत्रे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पाटण  - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 23 जूनपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने या जलवर्षात धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी 14 ऑगस्टला दुसऱ्यांदा पाणी सोडले. दरवाजे चार फुटांपर्यंत उचलल्याने आता पाणीसाठा नियंत्रणात असला तरी दीड महिना पावसाचा बाकी असताना पाणीसाठ्याचे शतक पार करण्याचा निर्णय व्यवस्थापनाचा फसलेला दिसतो. 

पाटण  - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 23 जूनपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने या जलवर्षात धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी 14 ऑगस्टला दुसऱ्यांदा पाणी सोडले. दरवाजे चार फुटांपर्यंत उचलल्याने आता पाणीसाठा नियंत्रणात असला तरी दीड महिना पावसाचा बाकी असताना पाणीसाठ्याचे शतक पार करण्याचा निर्णय व्यवस्थापनाचा फसलेला दिसतो. 

गेले 57 दिवस सातत्याने पाऊस पडत आहे. सुरवातीला 17 जुलैला पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यास आले. दरवाजे सात फुटांपर्यंत उचलून पाणीसाठा नियंत्रणात आल्यानंतर नवव्या दिवशी दरवाजे बंद केले होते. मात्र, 11 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढल्याने 14 ऑगस्टला पुन्हा सहा वक्र दरवाजांतून पाणी सोडण्यास धरण व्यवस्थापनाने सुरवात केली. जलाशयाच्या परिचालन सूचीपेक्षा चार टीएमसी पाणीसाठा जास्त झाला असताना हा निर्णय घेतला असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. 

12 ऑगस्टला 2157.06 फूट एवढी पाणीपातळी जलाशय परिचालन सूचीला अपेक्षित होती. 12 ते 14 ऑगस्ट या तीन दिवसांत साडेपाच टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली व 2160.08 फूट पाणीपातळी झाली. 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरणात पावसाचा दीड महिना बाकी असताना पाणीसाठा न फुगविता 100 टीएमसीपर्यंत मर्यादित ठेवणे गरजेचे होते. 

धरण परिचालन सूचीनुसार 17 ऑगस्टला धरणाची पाणीपातळी जास्तीत जास्त 2158.11 फूट व पाणीसाठा 99 टीएमसी असायला हवा होता. मात्र, धरण परिचालन सूचीतील 26 ऑगस्टला अपेक्षित पाणीपातळी 2160.05 फूट ही 15 ऑगस्टलाच झाल्याने मूळगावचा पूल पाण्याखाली जाण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली. गतवर्षीच्या तुलनेत जलाशयात पाणीसाठा जास्त आहे. धरणात सध्या 101.24 टीएमसी पाणीसाठा आहे. पावसाचा जोर वाढल्याने 50 हजार क्‍युसेकपेक्षा जास्त पाणी कोयना नदीत सोडावे लागले. आज पावसाचा जोर कमी झाला असून दरवाजे आज सकाळी सात वाजता चार फुटांवर आणण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. 

पाणीसाठा नियंत्रणाचा निर्णय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे घेतला आहे. 11 ऑगस्टला 12 हजार क्‍युसेक असणारी आवक दोन दिवसांत 30 हजार क्‍युसेकच्या वर गेल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रणासाठी चार फुटांपर्यंत दरवाजे उघडले गेले. 
- कुमार पाटील, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयना 

Web Title: Water supply schemes