टॅंकर मागणीच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

आठ तालुक्‍यांत 29 टॅंकर सुरू; 37 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा
सातारा - जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढू लागल्या असल्या तरी जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत २९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज ७० खेपांद्वारे ३७ हजार ६९५ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे.

जलसंधारणाच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असल्याचे महसूल विभागाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात टॅंकर मागणीचे प्रस्ताव येऊनही त्याकडे तहसील पातळीवर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. 

गेल्या दोन ते चार वर्षांत झालेल्या जलयुक्त शिवार अंतर्गत कामांमुळे जिल्ह्यातील टॅंकरग्रस्त गावेही जलस्वयंपूर्ण झाली आहेत. त्यामुळे एरव्ही दोनशे ते अडीचशे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. पण, यावर्षी मे महिन्यात आतापर्यंत केवळ २९ टॅंकर सुरू झाले आहेत. जलयुक्त शिवार तसेच स्वंयसेवी संस्थांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे पुढील वर्षी जिल्हा टॅंकरमुक्‍तीच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्‍यता आहे. सध्या खटाव, माण, कोरेगाव व खंडाळा तालुके वगळता उर्वरित महाबळेश्‍वर, पाटण, वाई, जावळी तालुक्‍यांत झालेल्या पावसाचे पाणी अडविले नसल्याने डोंगर उतारावर असलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

त्यामध्ये महाबळेश्‍वर तालुक्‍यातील दोन, वाई तालुक्‍यातील तीन, तर पाटण तालुक्‍यातील दोन, जावळी तालुक्‍यातील आठ गावांचा समावेश आहे. 
जिल्ह्यात सर्वाधिक झळा माण तालुक्‍याला बसत आहे. या तालुक्‍यात १२ गावे व ६४ वाड्यावस्त्यावर आठ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी संरक्षित करण्यासाठी १५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

यामध्ये माण तालुक्‍यात चार, खटाव तालुक्‍यात एक, वाई तालुक्‍यात एक, जावळी तालुक्‍यात पाच, महाबळेश्वर चार विहिरींचा समावेश आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असली तरी मात्र उष्णतेत वाढ होईल तसतशी टंचाईत वाढ होऊ लागली आहे. यामुळे अनेक गावांकडून टॅंकरचे प्रस्ताव येऊन देखील जलसंधारणाच्या कामाचा परिणाम दिसावा यासाठी तहसील पातळीवर प्रस्तावांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. 

तालुकानिहाय टॅंकरची संख्या
माण - 8
खटाव  - 3
कोरेगाव - 4
वाई - 3
पाटण  - 2
जावळी - 2
महाबळेश्‍वर - 1

Web Title: water tanker demand