टँकर, चारा छावण्यांवर होणार्‍या कोट्यावधी रूपयांची बचत होणार

Solapur
Solapur

कुर्डू (सोलापूर) : विठ्ठल गंगा बेंद ओढा प्रकल्पामुळे राज्य शासनाचे दुष्काळ व टंचाईकाळातील आपत्कालीन व्यवस्थापनाचे टँकर व चारा छावण्यांवर होणार्‍या  कोट्यावधी रूपयांची  बचत होणार असल्याचे मत कुर्डूवाडी उपविभागाचे प्रांताधिकारी मारूतीराव बोरकर यांनी ढवळस व चौभेपिंपरी याठिकाणी विठ्ठलगंगा प्रकल्पास भेट देऊन पाहणी करते वेळी केले. 

यावेळी  माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे, ढवळसचे माजी सरपंच संतोष अनुभूले,सरपंच अमर इंगळे, सचिव युवराज शिंदे, कांतिलाल काळोखे ,नितीन साळुंके,संदिपान ठोंबरे, रावसाहेब अनुभुले ,सुभाष काळोखे,काकासो अनुभुले, भाऊसो अनुभुले,दादा चव्हाण, अभियंता विलास गुटाळ, विजय साठे, माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे  वाय.जी.भोसले,श्रीकांत पाटील, लखन पाटील, सुजित थिटे, सागर खटके, ओंकार नलवडे, आनंदभाऊ पाणबुडे, महेश डोके,राहुल वरपे,किशोर शिंदे, सुहास लठ्ठे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी बोरकर म्हणाले की , राज्य शासनाचा भुसंपादनासाठी एकही पैसा खर्च न होता सुमारे 35 किमी च्या बेंद ओढ्याचे काम शासन, सी.एस.आर, एनजीओ यांच्या समन्वयातून  होत असून त्याकरिता या प्रकल्प यंत्रणेतील घटक अहोरात्र झटत असून या सर्व घटकांचे काम समाधानकारक आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माढा तालुकास्तरीय समितीचा प्रमुख या नात्याने  सहभागी यंत्रणांचे  अभिनंदन करून राज्य शासनाच्या प्राथमिकतेचा मुद्दा असलेला जलसंवर्धन हा विषय हाती घेऊन माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी यांनी केले.

सध्याच्या काळात भुसंपादन हा फार खर्चिक व वादाचा मुद्दा होत असलेला दिसत असून सामंजस्य व सामोपचार या बाबी सार्वजनिक हिताची कामे होण्याच्या दृष्टीने  महत्त्वाची आहेत .न्यायालयिन प्रक्रियेत जनतेच्या होणाऱ्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय सामंजस्याच्या भुमिकेमुळे वाचणार आहेत.तसेच या ओढ्याकाठच्या शेतकरी व इतर सर्व  घटकांच्या उपजीविकेची साधने बळकट होणार असून या प्रकल्पासाठी महसूल विभागाचे सर्व प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून  देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या कामामुळे सुमारे 13 गावे, 1 नगरपंचायत व एक नगरपरिषद आदी गावांच्या कार्यक्षेत्रातून पाणी अडविणे व पाणी मुरवणे या उपाययोजनांमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठी मदत होणार आहे. 

आजपर्यंत या प्रकल्पाचे पंच्यानऊ हजार घन मीटरचे काम पूर्ण झाले असुन. या साठी नाम फाऊंडेशन च्या चार पोकलेन मशिन, माढा वेल्फेअर च्या दोन मशीन, महाराष्ट्र शासन यांत्रिकी विभागाच्या दोन पोकलेन मशिन, खाजगी काॅन्ट्रॅक्टर चे एक पोकलेन, एक डोझर असा दहा वाहनांचा ताफा आहोरात्र कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com