गाजणार ‘जीपीएस’...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

सातारा - दुष्काळी तालुक्‍यात सध्या टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, टॅंकरच्या खेपा वाढवून दाखवण्यासाठी टॅंकरची जीपीएस यंत्रणा दुचाकीला बसविल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला होता. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी होण्याची शक्‍यता आहे. सध्या जिल्ह्यातील ५१ गावे  आणि २९५ वाड्यांना ४९ टॅंकने पाणीपुरवठा केला जात असून यामध्ये माण, खटाव, कोरेगाव आणि फलटण तालुक्‍यांतील गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आणि खंडाळा या तालुक्‍यांसह सातारा, वाई, कऱ्हाड तालुक्‍यांतील काही मंडलांत दुष्काळ जाहीर झाला आहे.

येथे दुष्काळी उपाययोजना सुरू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण, प्रत्यक्षात टॅंकरच्या खेपातून खाबूगिरी सुरू झाली आहे. माण तालुक्‍यात टॅंकरच्या खेपा वाढलेल्या दाखविण्यासाठी पाण्याच्या टॅंकरला जोडलेली जीपीएस यंत्रणा काढून दुचाकीला जोडली जात आहे. त्यातून टॅंकर जागेवर आणि दुचाकीच्या हेलपाट्याने जादा खेपा दाखविल्या जात आहेत.

प्रत्यक्षात गावांत टॅंकरच पोचत नसल्याचे चित्र आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी आवाज उठविल्यानंतर प्रशासकीय पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या होत्या. आता उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याच मुद्द्यावरून आमदार व नियोजन समितीच्या सदस्यांकडून रोजगार हमी योजना, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्‍यता आहे. 

सध्या दुष्काळी गावात टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. सध्या ५१ गावे आणि २९५ वाड्यांना ४९ टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईच्या झळा माण, खटाव आणि फलटण तालुक्‍यांत अधिक असल्याचे चित्र आहे.

जूनअखेर चारा कमी पडणार
दुष्काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागाकडे असून पाच लाख १७ हेक्‍टरवर दोन लाख नऊ हजार मेट्रिक टन चारानिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण, जूनअखेर एक लाख २४ हजार मेट्रिक टन चारा कमी पडण्याच्या शक्‍यतेने पशुसंवर्धन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Water Tanker GPS System