उजनीतून सोलापूरला पाणी

Ujani-Dam
Ujani-Dam

सोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविला आहे. सध्या धरणातून भीमा नदीमध्ये आठ हजार १०० क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. 

धरणातून भीमा नदीमध्ये सोमवारी रात्रीपासून एक हजार ६०० क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरवात केली होती. त्यानंतर त्यामध्ये आज सकाळी सहा वाजता एक हजार ९५० क्‍युसेकने वाढ केली. त्या वेळी नदीमध्ये एकूण तीन हजार ५५० क्‍युसेकने पाणी सोडले जात होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता विसर्गामध्ये तीन हजार ९०० क्‍युसेकने वाढ केली. त्या वेळी नदीतून पाच हजार ५०० क्‍युसेकने पाणी जात होते. त्यानंतर आज शेवटी दुपारी तीन वाजता सहा हजार ५०० क्‍युसेकने वाढ करत तो आठ हजार १०० क्‍युसेकपर्यंत नेण्यात आला.

नदीपात्रामध्ये असलेल्या खड्यांमुळे पाणी पुढे सरकण्यात अडचणी निर्माण झाल्या तर नदीमधील विसर्गामध्ये वाढ केली जाण्याची शक्‍यता लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सूत्रांनी व्यक्त केली. पुढील पाच-सहा दिवसांत पाणी औज बंधाऱ्यात पोचण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com