सांगलीत इदगाहजवळील एयरव्हॉल्व्हमधून पाणी गळती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

थेट गटारात वाया जाणारे हे पाणी पाहून चुकचुकण्यापलीकडे नागरिकांना काहीही करता येत नाही. याबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही ही गळती निघालेली नाही.

सांगली - महापालिका 70 एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वीत करण्याच्या जोरदार तयारी करीत आहे. मात्र शहरातील शेकडो बेकायदेशीर नळ जोडण्या तसेच मुख्य वाहिन्यांची गळती हेच पुरवठा यंत्रणेपुढचे आव्हान आहे. गेले महिनाभर येथील इदगाह मैदानाजवळ पालिकेच्या एयर व्हॉल्व्हमधून धो धो पाणी वाहत आहे. थेट गटारात वाया जाणारे हे पाणी पाहून चुकचुकण्यापलीकडे नागरिकांना काहीही करता येत नाही. याबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही ही गळती निघालेली नाही.

याबाबत स्थानिक नागरिक व सुधार समितीचे कार्यकर्ते संजय जाधव म्हणाले, 'मेन लाईनच्या एयर व्हॉल्व्हला गळती आहे. गेले दिड महिना दुरुस्ती केली आहे. पुन्हा चार दिवसाने हेच होते. तक्रार केल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती होते.'

पाणी पुरवठा विभागाचे अभिंयता शीतलनाथ उपाध्ये म्हणाले, 'या लाईनवरील शहरातील तीन ठिकाणांवरील एयर व्हॉल्व्ह निकामी झाले आहेत. काही दुकानदारांनी त्याचा त्रास होतो म्हणूनही बंद केले आहेत. इदगाहजवळील एयर व्हॉल्व्ह पुर्ण बंद केल्यास मुख्य वाहिनीला ठिकठिकाणी दाबामुळे गळती सुरु होऊ शकते. नवे एयर व्हॉल्व्ह बसवण्यासाठी आम्ही निविदा मागवल्या आहेत. तुर्त तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहेत.'


आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Water Waste in Sangli