महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीचा मार्ग मोकळा

The way of selection of standing committee members of municipal corporation has become freed
The way of selection of standing committee members of municipal corporation has become freed

सोलापूर : विभागीय आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यामुळे महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदस्य निवडले तरी सभापती निवड न्यायप्रविष्ठ असल्याने समिती अस्तित्वात येणार नाही. न्यायालयाच्या निकालानंतरच समिती स्थापन होणार की नाही हे स्पष्ट होईल. बुधवारी (ता. 20) होणाऱ्या सभेत आठ सदस्यांची निवड होईल.

सभापती निवडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने सदस्य निवड करता येणार की नाही याबाबत साशंकता होती. त्यामुळे विधान सल्लागारांनी विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय मागविला. त्यावेळी, तरतुदीनुसार सदस्यांची मुदत संपत असल्याने सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण करता येईल, मात्र सभापतींची निवड करता येणार नाही, असा अभिप्राय देण्यात आला आहे. त्यानुसार हा विषय सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे. 

विद्यमान समितीतून आठ सदस्य दोन वर्षे पूर्ण झाल्याने निवृत्त होणार आहेत. त्यामध्ये भाजपचे चार, काँग्रेसचे दोन, शिवसेना आणि बसपचे प्रत्येकी एक सदस्याचा समावेश आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांपैकी श्रीनिवास करली, मनीषा हुच्चे आणि राजेश्री बिराजदार यांनी भाजपकडे पुन्हा संधी मागितली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यामार्फत त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. चौथे सदस्य नागेश वल्याळ हे थेट 'मुंबई'हून उमेदवारी पुन्हा निश्‍चित करतील, अशी चर्चा आहे. या चौघांशिवाय, भाजपकडून राजेश काळे आणि संतोष भोसले हेही इच्छुक आहेत. काँग्रेसकडून नरसिंग कोळी पुन्हा इच्छुक आहेत. तथापि या वेळी एक महिला आणि पुरुषाला संधी देण्याचे नियोजन केले आहे. काँग्रेसकडून अनुराधा काटकर, फिरदोस पटेल किंवा वैष्णवी करगुळे यांच्यापैकी एक आणि श्री. कोळी किंवा विनोद भोसले यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. बसपकडून आनंद चंदनशिवे हेच नाव पुन्हा निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे, तथापि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लिंगायत समाजाच्या ज्योती बमगुंडे यांनाही संधी देण्याबाबत विचार होऊ शकतो. 

  • सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी -

स्थायी समिती सभापती निवडीसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सोमवारी (ता. 18) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय निकाल लागतो त्यावर पुढील धोरण ठरणार आहे. या याचिकेच्या निकालानंतरच स्थायी समिती अस्तित्वात येणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com