भाजप-शिवसेना युतीत आमचा सहभाग नाही - राणे

भाजप-शिवसेना युतीत आमचा सहभाग नाही - राणे

अकलूज - आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली, तर महाराष्ट्र स्वभिमानी पक्ष त्यात सहभागी होणार नाही, असे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी आज येथे स्पष्ट केले. माळशिरस येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदर संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, 'राऊत जे ठरवतात तीच ठाकरेंची भूमिका असते. भाजप - शिवसेनेच्या युतीत आम्ही कदापि सहभागी होणार नाही. पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाची पायाभरणी झाली असताना, पुन्हा पायाभरणी कशासाठी. सरकार स्मारकाबाबत वेळकाढूपणा करीत आहे. आरक्षणाबाबत मराठ्यांचा अंत पाहू नका, मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी आपण रस्त्यावर उतरू.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com