हक्काच्या आरक्षणासाठी जेल मध्ये जाण्याची तयारी ठेऊ : इम्रान दारुवाले 

सुनील गर्जे 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नेवासे : मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नेवासे फाटा येथे मंगळवारी रस्तारोको आंदोलन करण्यात आले युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते इम्रान दारुवाले व अल्ताफ पठाण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

मंगळवारी  नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासे फाटा येथे राजमुद्रा चौकात मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मुस्लिम समाजातील रस्त्यावर आले. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार रास्तारोको केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली.

युवा नेते इम्रान दारुवाले म्हणाले की, आज मुस्लिम समाज उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे समाजाचा उत्कर्ष नाही आमची ही मुलं बाळ अधिकारी व्हावेत असे आमचे स्वप्न असल्याने सरकारने अधिक अंत न पाहता मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी करत हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने करत असून आमच्या न्यायहक्का साठी आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन त्रिव करू प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेऊ असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.

यावेळी अॅड. राजुभाई इनामदार, जेष्ठ नेते गफूरभाई बागवान, राजमहंमद शेख, अॅड. जमीर शेख, रिपाईचे नेते अशोक गायकवाड, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. वसंतराव नवले, मराठा महासंघाचे गणेश झगरे, मौलाना जाकिर शेख, मुन्ना शेख, नजीर सय्यद, इरफान शेख, हारूण जहागीरदार, नवीद दारुवाले, युनुस नाईकवाडी, नगरसेवक फारुक आतार, फारुक कुरेशी, फिरोज पटेल, असिर पठाण, एजाज पटेल, अब्बास बागवान, इसाक इनामदार, मुस्तकीम शेख, समीर फिटर, शेखर अहिरे, सोहेल सय्यद, शाहिद पठाण, सलमान आतार, अज्जू पठाण, अमीन शेख, शाहरुख शेख, जिशान दारुवाले यांच्यासह सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: we are ready to go to the jail for reservation said imran daruwale