गांधीजीचं शेती विषयीचं शहाणपण आमच्या लक्षातच आलं नाही - अभय भंडारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण प्रश्न सोडविण्यापेक्षा टोलविण्यात पारंगत झालो असल्याची खंत साहित्यिक वक्ते अभय भंडारी यांनी  व्यक्त केले.

मंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण प्रश्न सोडविण्यापेक्षा टोलविण्यात पारंगत झालो असल्याची खंत साहित्यिक वक्ते अभय भंडारी यांनी  व्यक्त केले.

रतनचंद शहा स्मृती व्याख्यानमालेत भारतीय शेती चिंता आणि चिंतन या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. सुरुवातीला स्व. रतनचंद शहा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. बँकेचे चेअरमन राहूल शहा, उपाध्यक्ष रामचंद्र जगताप, मुझफ्फर काझी, ॲड. रमेश जोशी शिवदास चिंचकर, भुजंगराव पाटील, किसन गवळी, डी.के. दत्तु, चंद्रशेखर कौंडूभैरी, हजरत काझी, भीमराव मोरे, शरद हेंबाडे, जनार्दन नेने, इन्नुस शेख, कवी शिवाजी सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भंडारी म्हणाले की, देशी गाय मालकाला ओळखते पण जर्सी निर्बुद्धतेने वागते. तरीही आपण जर्सीलाच जास्त पौष्टीक खाऊ घालतो. कृषी शिक्षण घेतलेले शंभरातले पाचही विद्यार्थी शेती करत नाहीत. शेतीकडे पाठ फिरवल्याने शेतीचा सत्यानाश झाला. महात्मा गांधीचं शहाणपण लक्षात यायला हवं. गावाला लागतं ते गावातच निर्माण झालं पाहिजे. पण माणसांची मानसिकताच विचित्र झाली. आपल्याच जमिनीतलं पाणी आपल्याला पचत नाही तेव्हा मिनरल वॉटरसाठी हजारो कोटी खर्चणारे कोडगेपण इथे आहे. एक रुपयाची नोट न पाहता हजारों लोक सुखाने जगले. उघड उघड समाजाचा सत्यानाश होत असताना आम्ही पाहत बसण्यापेक्षा कागदाच्या डिग्र्या चुलीत घालण्याची वेळ आली. खेडी हेच तुमचं भविष्य आहे. शहरात जीवनच नसल्याने सुखाचा श्वासही कोठून येणार. 

यावेळी प्रास्ताविक ॲड. रमेश जोशी यांनी केले तर, आभार व्यवस्थापक हेमंत गरवारे यांनी मानले. सूत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव यांनी केले. दत्तात्रय शिर्के, राजेंद्र कट्टे, अंबादास बेंद्रे, विजयकुमार जगताप, चंद्रकांत कोंडूभैरी, संदीप पुळुजकर, विष्णू जावळे, संतोष घाडगे, विवेक चिंचकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: We did not realize the importance of Gandhiji's farming - Abhay Bhandari