हाय ते हाय...आम्ही टेंशन घेत नाही आम्ही टेंशन देतो !

सिद्धार्थ लाटकर
रविवार, 28 जुलै 2019

राजकारणापलीकडचा दिवस आज शिवेंद्रसिंहराजेंनी एनजॉय केला.

सातारा ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक सोशल मिडियाच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधू लागले आहेत. आज (रविवार) शिवेंद्रसिंहराजेंनी मित्र परिवारासमवेत सातारा नजीक ऑफ रोडींगचा आनंद लुटला. तोच सोशल मिडियावर राजेंच्या छायाचित्रसाह हाय ते हाय...आम्ही टेंशन घेत नाही आम्ही टेंशन देतो ! अशा पोस्ट समर्थकांनी व्हायरल केल्या.सातारा जावळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. 25) झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुलाखतीस अनुपस्थित राहिले. त्या दिवसांपासून ते भाजपच्या वाटवेर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्या दिवसापासून शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक बाबा राजे हाच आमचा पक्ष. ते सांगतील तेच आमचे धोरण असे सोशल मिडियातून शिवेंद्रसिंहराजे जे निर्णय घेतील त्यासोबत आम्ही आहोत असे पाठबळ देऊ लागले आहेत. गेल्या तीन दिवसांत अनेक कार्यकर्त्यांनी शिवेंद्रसिंहराजे कट्टर समर्थक, बाबाराजे फॅन क्‍लब अशा व्हॉटसऍप ग्रुप, फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्याची माहिती, त्यांच्या आगामी विकासकामांची माहिती आदी गोष्टी पोस्ट केल्या जात आहेत. शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपात प्रवेश केल्यास त्याचे परिणाम कऱ्हाड उत्तर व कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर होतील अशी ही चर्चा सोशल मिडियात होत आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. आज (रविवार) सातारा शहारानजीक झालेल्या ऑफ रोडींगमध्ये (दुर्गम भागातील ड्रायव्हिंग) 
शिवेंद्रसिंहराजे सहभागी झाले होते. फोर बाय फोर प्रकारच्या जिप्सीतून त्यांनी कधी डोंगर दऱ्यातून, चिखलांतून, खोल पाण्यातून आपले कौशल्य दाखविले. त्यांच्या समवेत पत्नी वेदांतिकाराजे ही होत्या. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांचे ऑफ रोडींगचे स्टंट सोशल मिडियात व्हायरल झाले. कोणत्या ही खडतर व संघर्षमय प्रवासात बाबाराजे सहज मार्ग काढतात, ओनली शिवेंद्रसिंहराजे अशा प्रकारच्या कमेंटस 
पोस्ट होऊ लागल्या. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक या पेजवर शिवेंद्रसिंहराजे व्हीक्‍टरीचे चिन्ह दाखवितानाचे छायाचित्र अपलोड करण्यात आले. त्या पोस्टमध्ये हाय ते हाय...आम्ही टेंशन घेत नाही आम्ही टेंशन देतो ! असे नमूद केले आहे. राजकारणापलीकडचा दिवस शिवेंद्रसिंहराजेंनी एनजॉय तर केलाच परंतु त्यांचे समर्थक ही नेत्याविषयीचे प्रेम अधोरेखित करण्यासाठी एकही संधी दवडत नाहीत असे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We don't take tension We pay tension!