नगरला भयमुक्त करेन : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नगर : नगरमध्ये भयमुक्तीचा नारा वर्षानुवर्षे दिला गेला. मात्र, त्यांच्याकडूनच नगरला जास्त भीती आहे. त्यांची गुंडशाही व झुंडशाही कुणाची याचीही माहिती आहे. तुमच्यापासून नगरला मी भयमुक्‍त करेन, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नगरमध्ये मांडली.

नगर महानगरपालिका निवडणुकीनिमित्त भाजपच्या उमेदवारांसाठी शहरातील गांधी मैदानात आयोजित सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार सुरजितसिंग ठाकूर व सुरेश धस, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड व जिल्ह्यातील स्थानिक आमदार, उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, "मुलभूत सुविधांची वाट लागली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रस्त्यांची अवस्था बकाल झाली. रोजगाराच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे नगर शहरला बदलाची आवश्‍यकता आहे. येथील पिण्याच्या पाण्याचा, सांडपाणी, घनकचऱ्याचा प्रश्‍न महत्वाचा आहे. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे नगरचा विकास खुंटला आहे. शहराचे आरोग्यच खराब झाले आहे. ते सुधारण्याची गरज आहे.'' 

Web Title: We Will Fearless to Ahmednagar says Chief Minister Devendra Fadnavis