बदल्यातील त्रुटीप्रकरणी संघ आयुक्तांना भेटणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सांगली : शिक्षकांच्या बदल्यातील त्रुटीमुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. ज्यांनी आक्षेप नोंदवले त्यांच्यावर दीड महिन्यानंतरही निर्णय झालेला नाही. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तांना भेटणार आहे, असे माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली. 

जिल्हा परिषदेकडील 2 हजार 500 हून अधिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या. प्रक्रियेत अनेकांची सेवाज्येष्ठता डावलून बदली झाली. 30 किमी अंतरात सेवेत असणाऱ्या पती-पत्नींच्या बदल्या 100 ते 150 किमीवर झाल्यात. ज्येष्ठ शिक्षकांनी मागितलेल्या शाळा कनिष्ठांना मिळाल्या. बदलीपात्र असताना विनंती बदली मागूनही मिळालेली नाही. अवघड क्षेत्रात काम करूनही पुन्हा बदली झाली. विषय बदलून दुसऱ्याच विषयाची जागा मागून बदली होणे, संवर्ग एक व दोनमधील अनेकांनी बोगस दाखले जोडून बदल्या करून घेतल्या आहेत. अशा अनेक त्रुटी राहिल्या आहेत. अन्याय झालेल्यांनी जिल्हा परिषद व एनआयसीकडे तक्रार करून दीड महिना झाला. मात्र निर्णय झालेला नाही. अन्यायग्रस्तांचे अर्ज घेऊन विभागीय आयुक्तांना भेटून तक्रारी मांडल्या जातील. 

पुणे विभागातील जिल्ह्यांच्या त्रुटीसंदर्भात सात जुलै रोजी आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यातील निर्णय समजला नाही. सर्व तक्रारदारांची बैठक 14 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात दुपारी दोन वाजता बोलावली आहे. सरचिटणीस अविनाश गुरव, हंबीरराव पवार, पोपट सूर्यवंशी, अरूण पाटील, तानाजी खोत, शशिकांत माणगावे आदी उपस्थित होते.

Web Title: We will meet the team commissioner in exchange for transfers