Weather Update : बेळगावचा पारा ३९.५ अंशांवर

यंदाचे सर्वाधिक तापमान; अंगाची होतेय लाहीलाही
weather update belgaum high temperature belgaum
weather update belgaum high temperature belgaumsakal

बेळगाव : चार दिवसांपासून उष्णता वाढली आहे. गुरुवारी (ता.२०) बेळगावचे कमाल तापमान मंगळवार (ता.१७) पेक्षा दोन अंशांनी वाढले. हे तापमान पुढील दोन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. २०) शहराचे तापमान ३९.५ अंश सेल्सियस होते.

बेळगाव शहरात यंदा पहिल्यांदाच अधिक तापमानाची नोंद झालेली आहे. यामुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या बेळगावमधील नागरिक उष्म्याने हैराण झाले आहेत. २०१६ मधील तापमानाचे ४० अंश सेल्सिअसचे रेकॉर्ड यावेळी मोडण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. यंदा प्रथमच बेळगाव जिल्ह्याचा पारा एप्रिलमध्ये चाळिशीजवळ पोहचला आहे.

राज्यातील अनेक शहराचे तापमान चाळीस अशांवर गेले आहे. बेळगाव आणि उपनगरात एप्रिलच्या महिन्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे बेळगावच्या कमाल तापमानात खूपच वाढ झाली आहे. गुरुवारचा दिवस यंदाच्या वर्षातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे.

दरवर्षी मे महिना सर्वाधिक उष्ण समजला जातो, मात्र सध्या एप्रिल महिन्याचे विसच दिवस झाले असता सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. रोजच्या रोज तापमानात वाढत होत चालली आहे. मंगळवारी ३८.६अंश सेल्सिअस, बुधवारी ३९.३ अंश सेल्सिअस व गुरुवारी ३९.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात होते. तत्पूर्वी दोन महिने अगोदरच अवकाळी पाऊस पडतो.

पाऊस पडल्यानंतर उष्णतेची तीव्रता देखील कमी होते. मात्र यंदा क्वचितच वळीवाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे उष्णता कमी झालेली नाही. उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ४० अंश सेल्सियस चे रेकॉर्ड मोडण्याची ही शक्यता आहे. यामुळे बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही तज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे.

तारीख - तापमान

  • १६ एप्रिल - ३५.६

  • १७ एप्रिल - ३७.८

  • १८ एप्रिल - ३८.६

  • १९ एप्रिल - ३९.३

  • २० एप्रिल - ३९.५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com