बेळगाव शहरात दुपारी झालेल्या पावसामुळे परिसरातील सखल भागात पाणीच पाणी

जोरदार पावसात नागरिक आसरा शोधताना दिसले. राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यामुळे येत्या चार दिवसात बेळगाव शहर परिसरातील मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
weather update rain in Belgaum city water in low lying areas Monsoon begins in Belgaum city
weather update rain in Belgaum city water in low lying areas Monsoon begins in Belgaum cityesakal

बेळगाव : बेळगाव शहरासह परिसरात गुरुवारी (ता. २) दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान तासभर झालेल्या पावसामुळे शहर परिसरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांसह रहिवाशांची तारांबळ उडाली. जोरदार पावसात नागरिक आसरा शोधताना दिसले. राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यामुळे येत्या चार दिवसात बेळगाव शहर परिसरातील मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असून गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

यामुळे बेळगाव पाणीच पाणी झाले होते. यंदा वळीव पावसाने देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यामुळे मान्सूनही चांगला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार मान्सूनपूर्व पावसाने देखील जोरदार सलामी दिली आहे. बेळगाव शहरात गुरुवारी दुपारी तीन वाजता गारांसह पावसाचे मोठे थेंब पडले. तासभर झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. त्यामुळे येथील कचरा रस्त्यावर आला होता. बुधवारी दिवसभर वातावरणात अचानक बदल झाला होता. तसेच गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत वातावरण नेहमीप्रमाणे होते. मात्र, दुपारी अडीचनंतर वातावरणात अचानक गारठा निर्माण होऊन तीननंतर जोरदार पाऊस झाला.

सकाळपासून वातावरण गरम असल्यामुळे अनेक जण विना छत्री व रेनकोट न घेता बेळगावला बाजाराला आले होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची देना उडाली.बेळगाव शहरातील गोवावेस , चन्नम्मा सर्कल, युनियन जिमखाना रोड, रामदेव गल्ली तसेच शहापूर वडगाव आदी भागात असलेल्या सखल भागात पावसाचे पाणी तुंबले होते. गेल्या पंधरा दिवसानंतर पहिल्यांदाच पाऊस लागल्यामुळे गटारीतील घाण रस्त्यावर आली होती. यामुळे त्यातून वाट काढणे ही ये जा करणाऱ्यांना मुश्किल बनले होते. अचानक आलेल्या पावसामुळे भाजीविक्रेत्यांची तारांबळ उडाली. यामुळे सुमारे तासभर बाजारपेठेत देखील गर्दी कमी झाली होती. पाऊस गेल्यानंतर गर्दी वाढली.

ग्रामीण भागातही पाऊस

बेळगावशहराप्रमाणे तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागात देखील जोरदार पाऊस झाला. सध्या शेती मशागतीची कामे आटोपती आली असल्याने भात पेरणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पेरणीची गती वाढविली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com